लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा-कोयलारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील कोयलारी येथील शेतकरी मंदा सेवकराम पातोळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या तीन शेळ्या व एक बोकडावर हल्ला चढवून जागीच ठार केले. तर त्यांच्याच घराला लागून असलेल्या गितेश मनोहर पातोळे यांच्या गोठ्यात बांधून ठेवलेली एक शेळी गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.कोयलारी येथील महिला शेतकरी मंदा पातोळे यांच्या तीन शेळ्या व एक बोकड, गोठ्यात बांधून ठेवले होते. शनिवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्यावर बिबट्याने हल्ला ठार करुन केले तर बोकडाला घेऊन बिबट्या जंगलाच्या दिशेने पळाला. मंदा पातोळे सकाळी उठल्यानंतर गोठ्याकडे गेल्या असत्या तिन्ही शेळ्या रक्ताच्या थारोळ्यात पडून होत्या तर बोकड गायब होता. शेजारी असलेल्या गितेश पातोळे यांच्या गोठ्यातील शेळी सुध्दा गंभीर जखमी अवस्थेत आढळली. याची माहिती त्यांनी त्वरीत वनविभाग कोयलारीचे बिटरक्षक बडोले व वनरक्षक मोहुर्ले यांना भ्रमणध्वनीवरुन दिली. वनरक्षकांनी त्वरीत घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. तसेच याची माहिती वरिष्ठांना दिली. मृत शेळ्यांची उत्तरीय तपासणी शेंडा येथील पशुधन पर्यवेक्षक कुंभरे यांनी केली. यामध्ये एका शेतकऱ्यांचे २५ हजाराचे तर दुसºयाचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले.मागील वर्षी कोयलारी शेतशिवारात बिबट्याचे दोन बछडे मृत पावले होते. त्यामुळे याच परिसरात बिबट्याने ठाण मांडले आहे. या घटनेमुळे गावकºयांमध्ये व परिसरात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी गावकºयांनी केली आहे.
बिबट्याने फस्त केल्या तीन शेळ्या आणि एक बोकड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 05:00 IST
सडक-अर्जुनी तालुक्यातील कोयलारी येथील शेतकरी मंदा सेवकराम पातोळे यांच्या गोठ्यात बांधलेल्या तीन शेळ्या व एक बोकडावर हल्ला चढवून जागीच ठार केले. तर त्यांच्याच घराला लागून असलेल्या गितेश मनोहर पातोळे यांच्या गोठ्यात बांधून ठेवलेली एक शेळी गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
बिबट्याने फस्त केल्या तीन शेळ्या आणि एक बोकड
ठळक मुद्देकोयलारी येथील घटना। गावकऱ्यांमध्ये दहशत