शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पिस्तूल विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 05:00 IST

या प्रकरणात आरोपी शुभम ऊर्फ दादू सुरेश भाये, रवींद्र रमेश बोरकर (२२,रा. नागपूर, ह.मु. सूर्याटोला) व पप्पू उर्फ व्ही.उमेश व्ही. नरसिंहराव (३५, रा. मरारटोली) या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ७.६५ बोअर असलेली पिस्तूल किंमत ५० हजार रुपये, मॅगझिन १६ सेमी. लांबीची व मुठीच्या बाजूने  चेंबरपर्यंत ९.५ सेमी रुंदी असलेली व ९ सेमी. असलेली ज्यामध्ये एक जिवंत काडतूस असलेली पिस्तूल जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देगड्डाटोली येथे पकडले आरोपींना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : घातपात करणाऱ्यांना मदत म्हणून देशी पिस्तूल विक्रीचा गोरखधंदा गोंदियात सुरू आहे. हा गोरखधंदा करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि.१०) सायंकाळी ४ वाजता  अटक केली आहे.  रामनगर पोलीस ठाण्यांर्गत गड्डाटोली परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र  मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, सहायक फौजदार लिलेंद्र बैस, करपे, पोलीस नायक तुरकर, शेख, महिला शिपाई गेडाम व पांडे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गड्डाटोली येथील प्रेरणा रामटेके यांच्या घरासमोर दोन इसम उभे दिसले. पथक तेथे गेले असता ते रामटेके यांच्या घराच्या बाजूला असलेल्या पायऱ्यांवरून पहिल्या माळ्यावर गेले. त्यांच्या मागे पायऱ्यावरून पहिल्या माळ्यावर गेल्यावर दोन इसम व एक महिला वऱ्हांड्यात दिसली.यावेळी शुभम ऊर्फ दादू सुरेश भाये (२१, रा. सिल्लेगाव) याच्या जवळून  पिस्तूल घेतले व तो बजाज हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रेरणा रामटेके यांच्या घरासमोर पिस्तूल विक्री करण्यासाठी उभा होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्या तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात आरोपी शुभम ऊर्फ दादू सुरेश भाये, रवींद्र रमेश बोरकर (२२,रा. नागपूर, ह.मु. सूर्याटोला) व पप्पू उर्फ व्ही.उमेश व्ही. नरसिंहराव (३५, रा. मरारटोली) या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी ७.६५ बोअर असलेली पिस्तूल किंमत ५० हजार रुपये, मॅगझिन १६ सेमी. लांबीची व मुठीच्या बाजूने  चेंबरपर्यंत ९.५ सेमी रुंदी असलेली व ९ सेमी. असलेली ज्यामध्ये एक जिवंत काडतूस असलेली पिस्तूल जप्त करण्यात आली.  या संदर्भात आरोपींविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी