शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
4
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
6
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
7
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
8
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
10
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
11
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
12
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
13
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
14
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
15
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले

३ तासांत साडेतीन लाख टिष्ट्वट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 5:00 AM

३१ ऑक्टोबर २००५ च्या शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेले आणि २२ डिसेंबर २००३ च्या शासन परिपत्रकानुसार १ जानेवारी २००४ पासून केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनपासून वंचित करून कर्मचाऱ्यांमध्ये नवीन-जुने असा भेदभाव करण्यात आला आहे.

ठळक मुद्देजुनी पेन्शन हक्क संघटनेचे आंदोलन : क्रांतीदिनी कर्मचाऱ्यांची पेन्शन क्रांती

लोकमत न्यूज नेटवर्कसोनपुरी : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे रविवारी (दि.९) क्रांतिदिनी जुनी पेन्शनची मागणी करणारे एक अनोखे आंदोलन पार पडले. यामध्ये राज्यभरातून लाखो कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला व जुनी पेन्शन योजना लागू करावी ही मागणी केली. या आंदोलनात जवळपास साडे तीन लाखांहून अधिक टिष्ट्ववट फक्त ५ तासांतच करण्यात आले.राज्यासह राष्ट्रीय पातळीवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील नॅशनल पेन्शन स्कीम रद्द करून जुनी पेन्शन स्कीम लागू करण्याची मागणी करण्यात आली. ३१ ऑक्टोबर २००५ च्या शासन परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेले आणि २२ डिसेंबर २००३ च्या शासन परिपत्रकानुसार १ जानेवारी २००४ पासून केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनपासून वंचित करून कर्मचाऱ्यांमध्ये नवीन-जुने असा भेदभाव करण्यात आला आहे.त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पेन्शन बहाली अभियान व राज्य पातळीवर म.रा.जुनी पेन्शन हक्क संघटनाद्वारे ९ ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून देशात टिष्ट्वटर वॉर माध्यमातून लाखो टिष्ट्वट व रिटिष्ट्वट करण्याचे आवाहन विजय बंधू व राज्य पातळीवर वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते.देशात रविवारी (दि.९) क्रांतिदिनी दुपारी १२ ते सायंकाळी ५ यावेळात लाखो टिष्ट्वट व रिटिष्ट्वट करून मृतक कर्मचाºयांच्या वारसाला कुटुंब निवृत्ती वेतन योजना आणि महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम १९८२ व १९८४ म्हणजे जुनी पेन्शन योजनेची मागणी करण्यात आली. यात ‘खासगीकरण भारत छोडो’ हा हॅशटॅग वापरून लाखो कर्मचाºयांनी जुनी पेन्शनची मागणी केली. कोरोना काळात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, पोलीस कर्मचारी, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, सफाई कामगार यांच्यासह सर्वच कर्मचाºयांनी आपल्या जीवाची काळजी न करता आपले कर्तव्य म्हणून आपापल्या परीने सेवा देण्याचे काम केले. त्यामध्ये अनेकांना संक्रमण देखील झाला तर काहींना आपले प्राण देखील गमवावे लागले. असे असताना त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन शासनाने त्यांना त्वरीत फॅमिली पेन्शन लागू करावी, जे कर्मचारी आपली संपूर्ण हयात शासन सेवा करतात त्यांना जुनी पेन्शन मिळावी, शासनाने लादलेली नवीन पेन्शन स्कीम ही बेभरवशाची असल्याने शासनाने मृतक कर्मचाऱ्यांविषयी सहानुभूती बाळगून त्यांच्या कुटुंबाला फॅमिली पेन्शन लागू करावी तसेच २००५ नंतर सेवेत रूजू सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी राज्याध्यक्ष खांडेकर, राज्यसचिव गोविंद उगले, जिल्हाध्यक्ष राज कडव, जिल्हा सचिव सचिन राठोड यांच्या नेतृत्वात कोषाध्यक्ष प्रवीण सरगर, जितू गणवीर, मुकेश रहांगडाले, संतोष रहांगडाले, सुभाष सोनवणे, सचिन शेळके, जीवन म्हशाखेत्री, विलास लांजे, महेंद्र चव्हाण, सचिन धोपेकर, सुनील चौरागडे, क्रांतीलाल पटले, किशोर नवखरे, प्रवीण चौधरीसह सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे.आतापर्यंत अनेक प्रकारे जुनी पेन्शन हक्क संघटनेने आंदोलन केले. परंतु ९ ऑगस्ट हा क्रांतिदिन असल्यामुळे विशेष महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच या दिवशी राज्यभरातून हे टिष्ट्वटर आंदोलन करण्यात आले .वितेश खांडेकर, राज्याध्यक्षनवीन पेन्शन योजना ही कर्मचाऱ्यांना अंधारात लोटणारी आहे. त्यांच्या कुटुंबाची सुरक्षितता निश्चित करण्यासाठी शासनाने कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू केलीच पाहिजे.राज कडव, जिल्हाध्यक्ष