शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

हजारो विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन घ्यावे लागतेय पडक्या शाळेत शिक्षण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 18:19 IST

२०० जीर्ण वर्गखोल्यांतून हजारो विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन : १० कोटी मिळाले; २० कोटी कधी देणार?

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ६४४ शाळा असून, लाखो विद्यार्थी शिक्षण घेतात. परंतु जिल्ह्यातील २०० वर्गखोल्या जीर्ण आहेत. मात्र, या जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांमधून हजारो विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत असल्याची बाब पुढे आली आहे.

काही महिन्यांपूर्वी गोरेगाव तालुक्यातील साईटोला येथील जि. प. शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याने तीन विद्यार्थी जखमी झाले. या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धोकादायक शाळेत शिकायला मुलांना पाठविणे आई-वडिलांना धोक्याचे वाटत आहे. शाळा आणि वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीमधून मागणी करण्यात आलेली आहे. या शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट जिल्हा परिषदेकडून केले जात नसून फक्त शाळा धोकादायक असल्यास याबाबत अहवाल दिला जातो.

२० वर्ग खोल्यांची त्वरित दुरुस्तीची गरजजिल्ह्यातील २०० वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी ३० कोटी निधीची आवश्यकता आहे. यंदा या वर्गखोल्यांसाठी १० कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. उर्वरित निधीची प्रतीक्षा आहे.

१० कोटींतून डागडुजी की नवीन बांधकाम ?एका वर्गखोलीची डागडुजी (रिपेरिंग) केले तर ५ लाख रुपये लागतात. आणि नवीन वर्गखोली बांधली तर १५ लाखांची गरज असते. जिल्हा नियोजनमधून मिळालेल्या दहा कोटींतून फक्त रिपेरिंग केले तर २०० वर्गखोल्यांची डागडुजी होईल. परंतु नवीन वर्गखोली केली तर ६४ वर्गखोल्या नवीन बांधल्या जातील. आता शिक्षण विभाग संपूर्ण डागडुजी की नवीन इमारत बांधकाम करते, हे वेळ ठरवेल.

दुरुस्तीसाठी २० कोटींची गरजशाळा आणि वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी एकूण ३० कोटींची गरज होती. मागील वर्षी जिल्हा नियोजन समितीमधून १० कोटी रुपये दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला आहे. आणखी २० कोटींची गरज आहे.

निधी कधी मिळेल?जिल्हा नियोजन समितीमध्ये यासाठी निधीची मागणी करण्यात आली असून, पालकमंत्र्यांच्या आदेशाने हा निधी उपलब्ध केला जातो. जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील २०० वर्गखोल्यांसाठी १० कोटी मिळालेत, उर्वरित निधी कधी मिळेल, असा जिल्हावासीयांचा सवाल आहे.

"गोंदिया जिल्ह्यातील जीर्ण वर्गखोल्यांसाठी १० कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातून नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम केले जाणार आहे. वर्गखोल्यांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवीन वर्गखोल्या बांधल्या जाणार आहेत."- सुधीर महामुनी, शिक्षणाधिकारी, गोंदिया

टॅग्स :gondiya-acगोंदिया