शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हजारो सरपंच घालणार विधानभवनाला घेराव ! शहरांप्रमाणेच गावखेड्याना विकासात प्राधान्य देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 14:59 IST

आठवडाभरापासून ग्रामपंचायती बंद : २८ ऑगस्टच्या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सरपंच सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यासह राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प पडले असताना शासन, प्रशासन आणि राज्यातील नेते मंडळी मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे सरपंच, उपसरपंच वर्गात आक्रोश निर्माण झाला आहे. यातूनच झोपलेल्या शासन, प्रशासनाला जागे करण्यासाठी बुधवारी (दि. २८) विधानभवनाला घेराव घालण्याचा निर्णय अखिल भारतीय सरपंच परिषदेने घेतला आहे. या आंदोलनाला राज्यभरातील हजारो ग्रामपंचायत पदाधिकारी सहभागी होणार असल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

विकासाच्या बाबतीत शासनाकडून नेहमीच शहर आणि गावखेडे यात भेदभाव केला जातो. यात शहरांना झुकते माप, तर खेड्याकडे दुर्लक्ष केले जाते. अलीकडेच ग्रामपंचायतींच्या तीन लाखांवरील विकासकामांना कात्री लावली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे. रोजगार हमी योजनेची देयके मिळालेली नाहीत, घरकुल योजनांचे अनुदान आलेले नाही, ग्रामीण जिल्हा परिषद रस्त्यांचे बेहाल आहेत. या सर्व समस्यांना शासन प्रशासन जबाबदार असताना ग्रामीण जनतेचा रोष मात्र सरपंच, उपसरपंचांना सहन करावा लागत आहे. हा भेदभाव बाजूला सारून शहरांप्रमाणेच गावखेड्याना विकासात प्राधान्य द्यावे, सर्व घरकुल योजनांची गतिमान अंमलबजावणी व्हावी, ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था दूर करावी, ग्रामपंचायतीचे अधिकार हनन थांबवून त्यांचे सक्षमीकरण करण्यात यावे, शाळांमध्ये शिक्षकांची तत्काळ भारती करावी, मानधनात भरीव वाढ करावी, अशा अनेक मागण्यांसाठी मागील ८ दिवसांपासून राज्यभरात ग्रामपंचायत कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात जिल्ह्यासह राज्यभरातील आमदार, खासदार, मंत्री यांना निवेदने देऊनसुद्धा त्यांच्याकडून पाहिजे तसे सकारात्मक पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे यांना केवळ मतांसाठी ग्रामीण जनतेची आठवण होते. सतत आठवडाभर शांतीच्या मार्गाने कामबंद आंदोलन करूनसुद्धा श शासन - प्रशासन आंधळे झाले असल्याने आता सरपंच आक्रमक होऊ लागले आहेत.

टॅग्स :gondiya-acगोंदियाgram panchayatग्राम पंचायत