शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टरमधील धानाचे पऱ्हे संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 05:00 IST

यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टर धानाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. त्यातच वातावरणातील बदलाचा परिणाम शेतीवर झपाट्याने होत असल्याने उत्पादनात सुध्दा घट होत आहे.

ठळक मुद्देपावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी चिंतातूर : जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मृग नक्षत्राला सुरूवात होवून १६ दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्यापही जिल्ह्यात दमदार मृगाच्या सरी बरसल्या नाही. त्यामुळे बळीराजाचे लक्ष आकाशाकडे लागले आहे. तर काही शेतकऱ्यांनी मृगाचा थोडा फार पाऊस झाल्यानंतर धानाचे पऱ्हे टाकले. मात्र पावसाने पाठ फिरविली असल्याने जिल्ह्यातील हजारो हेक्टरमधील धानाचे पऱ्हे संकटात आले आहे. येत्या तीन चार दिवसात पाऊस न झाल्यास काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १ लाख ९९ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड करण्यात येणार आहे. यात सर्वाधिक १ लाख ८९ हजार हेक्टर धानाचे क्षेत्र आहे. जिल्ह्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असल्याने धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्हा ओळखला जातो. मात्र मागील दोन तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीला तोंड देत आहे. त्यातच वातावरणातील बदलाचा परिणाम शेतीवर झपाट्याने होत असल्याने उत्पादनात सुध्दा घट होत आहे. त्यामुळे शेती म्हणजे तोट्याचा सौदा होत चालल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी मृगाचा पाऊस होताच पेरणीच्या कामाला सुरूवात करतात. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली. सुरूवातील जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुध्दा धानाचे पऱ्हे टाकण्यास सुरूवात केली. तर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकºयांनी आधीच धानाचे पऱ्हे टाकले. मात्र मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातून पाऊस गायब झाला असल्याने धानाच्या पºह्यांवरील ताण वाढला आहे. पावसाअभावी पऱ्हे वाळत चालले आहे. येत्या चार पाच दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून त्यांचे लक्ष चातकासारखे आकाशाकडे लागले आहे.पºहे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडजिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे त्या शेतकऱ्यांनी सुरूवातीलाच पऱ्हे टाकले.तर काही शेतकऱ्यांनी दरवर्षी प्रमाणे पावसाचा अंदाज बांधत धानाचे पऱ्हे टाकले. मात्र आता पाऊस गायब झाला असल्याने आणि उन्ह तापत असल्याने त्याचा पºह्यांवर परिणाम होत आहे. त्यामुळे सध्या पऱ्हे वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे.पाऊस सरासरी गाठणार काहवामान विभागाने यंदा जिल्ह्यात सरासरी १३५० मीमी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मात्र यंदा सुरूवातीलाच पावसाने पाठ फिरविली असल्याने आत्तापर्यंत केवळ १२५ मीमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी गाठणार की नाही अशी शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.पेरणी आणि पºह्यांच्या दृष्टीने सध्या पावसाची गरज आहे. हवामान विभागाने सोमवारपासून दमदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे पाऊस झाल्यास निश्चितच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मात्र तूर्तास तरी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट नाही.- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी