शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

हजारो अनुयायांनी केले बाबासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 23:56 IST

संविधानाचे रचनाकार डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त शहरातील हजारो बांधवानी आंबेडकर चौकात पोहचून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.

ठळक मुद्देरॅलीचे आयोजन : आतषबाजी सोबत मार्गदर्शनाचे कार्यक्रम, शहरात ठिकठिकाणी शरबतचे वाटप,

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संविधानाचे रचनाकार डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती निमित्त शहरातील हजारो बांधवानी आंबेडकर चौकात पोहचून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. त्यामुळे या परिसराला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.शनिवारी (दि.१४) सकाळी रामनगर येथील डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रॅलीची सुरूवात करण्यात आली. सुर्याटोला, आंबाटोली, सिंगलटोली, रामनगर, आंबेडकर वार्ड, कुंभारेनगर, लक्ष्मीनगर, भीमनगर, श्रीनगर, गौतमनगर, कुंभारटोली होत ही रॅली शहरात पोहचली. त्यानंतर सिंधी कॉलनी, चांदनी चौक, दुर्गा चौक, गोरेलाल चौक, गांधी प्रतिमा, जयस्तंभ होत आंबेडकर प्रतिमेजवळ पोहचली. दुसरी रॅली छोटा गोंदियातून गोविंदपूर, संजयनगर, मोठा गोंदिया, गौतमनगर, सिव्हिल लाईन होत मुख्य रॅलीत सहभागी झाली. रॅलीत भीम गीतांवर तरूण नाचत होते.दरम्यान सुभाष शाळेत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात नागपूरचे वक्ता पी.एस. चांगोले यांनी डॉ. आंबेडकर यांच्या गुरूसंदर्भात माहिती दिली.बाबासाहेबांना जाती नसलेला समाज अभिप्रेत होता. मनुष्य मनुष्याशी मनुष्याप्रमाणे वागावे असे ते म्हणाले. अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ज्योतिप्रकाश गजभिये, मंचावर अजाब शास्त्री, नगरसेवक पंकज यादव, प्राचार्य सुनील भजे, लोकेश यादव, विरेंद्रकुमार कटरे, सावन डोये, स्मिता सोनवाने उपस्थित होते.समता संग्राम परिषदेतर्फे भोजनदानडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समता संग्राम परिषदेकडून सकाळी ८ वाजता तहसील कार्यालय परिसरात डॉ.आंबेडकर प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जातीवादी शासनाचा निषेध केला. दुपारी १२ वाजतापासून समता संग्राम परिषद कार्यालयासमोर भोजनदान सुरू करण्यात आले. रॅलीत सहभागी हजारो नागरिकांनी भोजन केले. सदर कार्यक्रमासाठी संगटनेचे संयोजक प्रा.सतीश बन्सोड, माजी नगराध्यक्ष के.बी. चव्हाण, डॉ.निकोसे, संगटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद मेश्राम, महासचिव राजू राहुलकर, एस.डी. महाजन, रमन सतदेवे, वामन मेश्राम, अ‍ॅड. आनंद बोरकर, अ‍ॅड. गडपायले, जे.एम. खोब्रागडे, मधू खोब्रागडे, किरण फुले, प्रकाश वासनिक, राजाराम चौरे, के.टी. गजभिये, विनोद मेश्राम, सुनीता भालाधरे, अमन फुले, नरेंद्र बोरकर, प्रफुल लांजेवार, डी.आर. वैद्य, हर्षला वैद्य, डॉ.वियंका वैद्य उपस्थित होते.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती