शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

तलावातील हजारो मासे मृत; मत्स्य व्यवसायाचे दोन ते अडीच लाखाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 09:55 IST

गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेकांनी या तलावात मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे.

आमगाव :- नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर परिसरातील जोडाबोडी तलावात हजारो मासे मृत पडल्याचे आज सकाळी आढळून आले आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणारे दुर्गाप्रसाद रहेकावार, भाऊलाल भवरिया व संस्थेचे दिड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. अचानक हजारो मासे मृत पडल्याने कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले किंवा उष्णतेमुळे असण्याची शक्यता नागरिकांकडून वर्तविली जात आहे.

गोंदिया जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावांमुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेकांनी या तलावात मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. आमगाव नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या रिसामा येथील राधाकृष्ण मंदिर परीसरातील जोडाबोडी  तलाव मच्छिंद्र मत्स्यपालन सहकारी संस्था आमगाव ( रिसामा) या संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून हा तलाव लिलावाने भाडे तत्वावर घेत आहेत. तलावात मत्स्य व्यवसाय करून आपल्या कुटुंबाची गुजारण करतात. अनेक अडचणी वर मात करून ते हा मत्स्य व्यवसाय करतात.

शुक्रवारी सकाळी आजूबाजूला असणाऱ्यांनी काही मासोळी मरण पावलेल्या असल्याचे सांगितले. परंतू रात्रभरात संपुर्ण तलावातील हजारो मासे मृत पावल्याचे त्यांना आज पहाटे माहित झाले. सकाळी ५ वाजल्यापासून मृत मासे काढण्याचे काम केले असता अंदाजे 10 ते 15 क्विंटल मासे मृत पावल्याचे दिसून आले त्यामुळे संस्थेचे दिड ते दोन लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच तलावातील पाणी सुद्धा दुषित झाले आहे. तलावातील पाणी साठवन क्षमतेच्या १५ ते २० टक्के पाणी साठा असून सुद्धा मासे अचानक मरण पावलेल्या मुळे कुणीतरी जाणूनबुजून विषारी रसायन टाकले असावे किंवा उष्णतेमुळे मासे मृत्यू पावले असावे.परिस्थिती चा आढावा घेण्यासाठी मत्स्य विभागाचे अधिकारी व संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी अजुन पर्यन्त भेट दिलेली नाही. घटनेची चौकशी करून नुकसानभरपाई मिळावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष भाऊलाल भवरिया, सचिव दुर्गाप्रसाद रहेकवार व संचालक मंडळांनी मत्स्य विभागा कडे मागणी केली आहे.

टॅग्स :fishermanमच्छीमार