लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाचे दार तोडून कपाटात ठेवलेले ५० हजार रुपये २९ ते ३० डिसेंबरच्या रात्री दरम्यान पळविणाऱ्या आरोपीला गोंदिया शहर पोलिसांनी १ जानेवारी २०२० रोजी अटक केली. आरोपी राजेश भारत गायकवाड (४०) रा.कवलेवाडा ता. कुरखेडा जि. गडचिरोली हा आरोपी घरफोडीच्या प्रकरणात सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याच्यावर गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.गोंदियाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील चोरी संदर्भात सुरेश श्याममुरारी जोशी (५४) रा. मामा चौक गोंदिया यांनी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आरोपी राजेश भारत गायकवाड (४०) रा. कवलेवाडा ता. कुरखेडा जि.गडचिरोली याला अटक केली आहे. त्याने यापूर्वी गोंदिया जिल्ह्याच्या केशोरी, नवेगावबांध, डुग्गीपार येथे चोरीच्या घटना केल्या आहेत.गडचिरोली जिल्ह्याच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया सडक-अर्जुनी येथे केलेल्या चोरीच्या प्रकरणात त्याला ३ वर्षाची शिक्षा सुणावण्यात आली होती. तो तुरूंगातून बाहेर पडल्यावर चोरीच्या घटना करीत होता. पोलिसांनी त्याला अटक करून मुख्य न्यायदंडाधिकारी भट्टाचार्य यांच्या न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या पोलीस कोठडीत चौकशी करून पोलिसांनी त्याच्या जवळून ३ हजार रूपये चिल्लर पैसे जप्त केले आहेत. ४ जानेवारी रोजी त्याला न्यायालयात हजर करून पुन्हा पोलीस कोठडी मागीतली जाणार आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, कैलाश गवते, पोलीस हवालदार राजू मिश्रा, छगन विठ्ठले, योगेश बिसेन, तुलसीदास लुटे, महेश मेहर, जागेश्वर उईके, सुबोध बिसेन, विनोद शहारे यांनी केली आहे.
‘त्या’ चोरट्यांवर दोन जिल्ह्यात गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST
गोंदियाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील चोरी संदर्भात सुरेश श्याममुरारी जोशी (५४) रा. मामा चौक गोंदिया यांनी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन गोंदिया शहर पोलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आरोपी राजेश भारत गायकवाड (४०) रा. कवलेवाडा ता. कुरखेडा जि.गडचिरोली याला अटक केली आहे.
‘त्या’ चोरट्यांवर दोन जिल्ह्यात गुन्हे दाखल
ठळक मुद्देचार दिवसाची पोलीस कोठडी : तीन वर्षाची झाली होती शिक्षा