शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तिसरे अपत्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना करणार बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 22:24 IST

लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय सेवेत असणाºया अ,ब,क,ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना २८ मार्च २००५ नंतर तिसरा अपत्य झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे. सन २००५ नंतर तिसरे अपत्य असलेले शेकडो कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत सेवा देत आहेत.

ठळक मुद्देजि.प.ने उचलले पाऊल : जिल्ह्यात २००५ नंतर शेकडो कर्मचाºयांना तीन अपत्य?

नरेश रहिलो।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय सेवेत असणाºया अ,ब,क,ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना २८ मार्च २००५ नंतर तिसरा अपत्य झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे. सन २००५ नंतर तिसरे अपत्य असलेले शेकडो कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत सेवा देत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी जिल्हा परिषदेने आता कडक पाऊल उचलले आहे. या नियमाची पहिली विकेट गेली आहे.लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र शासकीय नोकरीवर लागतांना द्यावे लागते. नोकरीत लागतांना शपथपत्रात दोनच अपत्य असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ३ जुलै रोजी पत्र काढून सर्व खातेप्रमुखांना हे पत्र पाठविले. आपल्या अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना त्वरीत किती अपत्य आहेत याचे प्रमाणपत्र, शपथपत्र सादर करा असे सूचविले आहे. परंतु महिनाभराचा कालावधी लोटूनही अद्याप तालुकास्तरावरून माहिती जि.प.ला प्राप्त झाली नाही.दोन पेक्षा अधिक अपत्य असलेले शेकडो लोक नियमाच्या बाहेर असूनही खुशाल नोकरी करीत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याचा चंग डॉ.राजा दयानिधी यांनी बांधला आहे. ही माहिती २३ जुलैपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्याचे निर्देश दिले आहे. परंतु खंडविकास अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती पाठविली नाही. लहान कुटुंब म्हणजे पती पत्नी व दोन मुले-मुली असा आहे.सुरूवातीला एक मूल असे आणि दुसऱ्या वेळी जुळे मुले जन्मली तर त्यांना यात सूट आहे.गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपापल्या अपत्यांची खरी माहिती दिल्यास २००५ नंतर तिसरा अपत्य होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तिसरे अपत्य असणाऱ्या कर्मचारी, अधिकारी यांना घरचा रस्ता दाखविण्याची मोहीम सुरू केली आहे.चुकीची माहिती देणाºयांवर फौजदारी गुन्हानोकरी जाऊ नये यासाठी तिन अपत्य असणारे लोक दोनच अपत्य असल्याचे खोटे शपथपत्र देण्याची शक्यता नाकारता येत नाही.ज्यांनी खोटे शपथपत्र सादर केले तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई जि.प.करणार आहे. त्यासाठी सत्य माहिती जि.प.ला देणे अपेक्षित आहे.पोलीस विभागातही शोध मोहीमपोलीस विभागाबरोबर इतर विभागातही सन २००५ नंतर तिसरा अपत्य असणारे लोक नोकरी करीत आहेत.त्यांचेही शपथपत्र मागविल्यास पोलीस विभागासह अनेक विभागांचाही आकडा यासंदर्भात फुगून दिसेल.यासाठी संबधीत विभागाच्या बड्या अधिकाºयांनी लक्ष घालावे.यांना केले बडतर्फमहाराष्ट्र नागरी सेवा २००५ च्या नियमाचे पालन न करणाºया चांदोरी खुर्द परसवाडा येथील सहाय्यक शिक्षक लक्ष्मी लिलाराम गोंधुळे यांना बडतर्फ करणयाची कारवाई जिल्हा परिषदेने केली.त्यांना ४ अपत्य असतांना ते शासकीय सेवेचा फायदा घेत आहेत. या त्यांच्या बडतर्फ करण्याच्या मुकाअ यांच्या आदेशाला अप्पर आयुक्त नागपूर यांनी स्थगीत केले असून त्यावर १७ सप्टेंबर २०१९ रोजी सुनावणी ठेवली आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद