शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

गोंदिया जिल्ह्यातील 'हे' १६ ब्लॅक स्पॉट ठरू शकतात जीवघेणे ! इथे ९ महिन्यांत झाले १३४ जणांचे मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 17:56 IST

जिल्ह्यात २५५ अपघात घडले : १२३ गंभीर तर ४९ किरकोळ जखमी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील ९ महिन्यांत २५५ अपघात घडले असून, या अपघातात १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. १२३ जण गंभीर जखमी झाले असून ४९ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जलद गतीने वाहन चालविणे, वाहतूक नियमांना बगल देत वाहन चालविणे यातून अपघात घडत आहेत. गोंदिया जिल्ह्यातील १६ ब्लॅक स्पॉटवर यमराज बसला आहे. त्यासाठी वाहने हळू चालवा असा सल्ला जिल्हा वाहतूक पोलीस देत आहेत.

रस्ते रुंद झाल्याने महामार्गावरील वाहनांची गतीही वाढली आहे. अशात सुरक्षा साधनांचा वापर करूनच प्रवास करणे अपेक्षित आहे. मोटार कंपनीने कितीही सुरक्षिततेची तजवीज वाहनात केली असली तरी त्याचा वापर करणे आवश्यक आहे. कारमध्ये बसले असताना सीट बेल्ट आवश्यक आहे. बऱ्याचदा सीट बेल्टशिवाय एअर बॅगही उघडत नाही. स्वतःचा जीव वाचविण्याकरिता वापर करणे आवश्यक आहे. तशी सवय लावून घेणे फायद्याचे आहे, अन्यथा जीव जाऊ शकतो. महागडी गाडी घेऊनही जिवाची सुरक्षा होत नसेल तर महागडी गाडी घेण्याचा काय उपयोग, असा सवाल उपस्थित होत आहे. 

सीट बेल्ट लावला नाही तर दंडात्मक कारवाई होते. सुरुवातीला ५०० रुपये दंड होतो. दुसऱ्यांदा आढळल्यास हजार रुपये दंड आकारला जातो. दंडाच्या भीतीने सीटबेल्ट लावण्यापेक्षा जीव वाचविण्यासाठी सीटबेल्ट लावण्याची सवय लावणे केव्हाही चांगले आहे.

हे आहेत १६ ब्लॅक स्पॉट

जिल्ह्यात एकूण १६ ब्लॉक स्पॉट आहेत. यात डुग्गीपारचा डव्वा, कोहमारा टी पाईट, परसोडी/खजरी, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत मुंडीकोटा, अदानी पॉवर प्लांट, बिरसीफाटा, गोंदिया ग्रामीण ठाण्यांतर्गत फुलचूर आयटीआय, नागरा बसस्टॉप, कारंजा बसस्टॉप, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत डोंगरगाव डेपो, देवरी नाला, रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत भागवतटोला शिवार, कटंगीकला शिवार, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत रावणवाडी बसस्टॉप, कोरणी नाका व सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत साखरीटोला हे ब्लॅक स्पॉट आहेत.

अपघातातील मृतक व जखमी महिनानिहाय

महिना             एकूण अपघात          मृतक        जखमीजानेवारी                  ३६                   १८             १७फेब्रुवारी                   ३२                  २२             १५मार्च                        २४                   १२             १५एप्रिल                      ३२                   १२             २९मे                            ३४                  १७             २४जून                         २५                   १३             १६जुलै                        २४                   १४             १५ऑगस्ट                    २८                   १३             ३०सप्टेंबर                     २०                   १३             ११

"सीट बेल्टचा नियम सर्वांनीच पाळावा जीवन सुरक्षा प्रणालीत सीट बेल्ट मोडतो. त्याचा वापर न चुकता करणे आवश्यक आहे. बेल्ट नसल्याने जीव गमावलेल्यांची संख्या मोठी आहे. त्यासाठी सर्वांनी सीट बेल्ट लावावा."- नागेश भास्कर, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा गोंदिया.

"दंड चुकविण्यासाठी बेल्ट लावल्याचा देखावा आपलीच फसवणूक करणारा आहे. जीवाच्या सुरक्षेपेक्षा मोठे काही नाही. यासाठी सीट बेल्ट प्रत्येकाने लावावे."- प्रकाश बहेकार, वाहन चालक पदमपूर 

"वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. मी गाडी चालविताना सीट बेल्टचा वापर करतो. त्यातून आपलीही सुरक्षा होते."- गोविंद बहेकार, वाहन चालक पदमपूर

English
हिंदी सारांश
Web Title : 16 Black Spots in Gondia District: Potential Death Traps

Web Summary : Gondia district reports 134 deaths in 9 months due to accidents. Speeding and traffic violations are major causes. Sixteen identified black spots pose significant risks, urging drivers to exercise caution and prioritize seat belt use for safety.
टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAccidentअपघातroad transportरस्ते वाहतूक