रंगमंचावरुन कुठलेही कार्यकम होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:00 AM2021-02-18T05:00:00+5:302021-02-18T05:00:06+5:30

संपूर्ण देशभरातील आदिवासी गोंड समाजाचे उगमस्थळ व प्रमुख श्रद्धास्थान असलेले तालुक्यातील कचारगड देवस्थान माघ पौर्णिमेला आदिवासी बंधू भगिनींसाठी महत्वाचे असून येथे वर्षातून एकदा कोयापूनेमी (माघपौर्णिमा) निमित्त आवर्जून उपस्थित राहून आपल्या पूर्वजांना नमन व स्मरण करुन जातात. ही ५ दिवसीय यात्रा विविध आयोजनांनी रंगलेली असते.

There will be no performances from the stage | रंगमंचावरुन कुठलेही कार्यकम होणार नाही

रंगमंचावरुन कुठलेही कार्यकम होणार नाही

Next
ठळक मुद्देकचारगड यात्रा २५ पासून : पारंपरिक महापूजा करण्यासाठीच भाविक येणार

सालेकसा : कोरोना संकटामुळे यंदा कचारगड यात्रा होणार की नाही याबद्दल भाविकांमध्ये संशय असून अद्याप प्रशासनाने याबद्दल परवानगी दिली नाही. तरी सुद्धा आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या कचारगड येथे माघ पौर्णिमा निमित्त कोयापुनेमी महापूजा नक्की होणार आहे. परंतु यात्रादरम्यान येथे रंगमंचावरुन कसलेही सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमांसह सभासंमेलन व इतर गर्दी वाढविणारे कार्यक्रम होणार नाही, असा निर्णय कचारगड समितीने घेतला आहे.
संपूर्ण देशभरातील आदिवासी गोंड समाजाचे उगमस्थळ व प्रमुख श्रद्धास्थान असलेले तालुक्यातील कचारगड देवस्थान माघ पौर्णिमेला आदिवासी बंधू भगिनींसाठी महत्वाचे असून येथे वर्षातून एकदा कोयापूनेमी (माघपौर्णिमा) निमित्त आवर्जून उपस्थित राहून आपल्या पूर्वजांना नमन व स्मरण करुन जातात. ही ५ दिवसीय यात्रा विविध आयोजनांनी रंगलेली असते. तसेच कचारगड हे देवस्थान नैसर्गिक स्थळी मोठ्या पर्वतरांगेत स्थापित असून येथे आशिया खंडातील सर्वात मोठी गुफा असून इतर छोट्यामोठ्या अनेक नैसर्गिक गुफांची शृंखला कायम आहे. 
वर्षानुवर्षे लोकांंना आकर्षित व आश्चर्यचकित करणाऱ्या या गुफा आहेत. त्यामुळे कचारगडला गैरआदिवासी पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येतात. अशता या ५ दिवसात दरवर्षी मोठा जनसागर उसळत असतो.
परंतु यंदा कोरोना संकट असून देशातील विविध राज्यातील भाविक येऊन गर्दी वाढवतील तर निश्चितच कोरोनाचे संक्रमण वाढू शकते. मोठ्या प्रमाणात कम्युनिटी स्प्रेड होऊन पूर्ण देशात कोरोना संक्रमण वाढविण्यास पोषक ठरु शकते. अशात गर्दी टाळणारे कार्यक्रम  होऊ न देणे यावर अधिक भर देण्यात येत आहे. त्यामुळे यंदा महासंमेलन, गोंडवाना महासभा, राजकारणी लोकांचे कार्यक्रम, धार्मिक प्रवचन व रात्रीचे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
पाच दिवस चालणार महापूजा
यंदा कोरोनामुळे गर्दी करणारे कार्यक्रम रद्द करण्यात आले तरी यात्रेचे पाच दिवस कोयापुनेमी महापूजा केली जाणार आहे. गोंड राजे गोंडी धर्माचार्य आणि गोंडी भूमकाल यांच्या हस्ते विधिवत पूजा करुन गोंडीध्वज फडकवून महापूजा व कचारगड यात्रेला सुरुवात केली जाईल. बाहेरुन कुणी आले नाही तर कचारगड देवस्थान समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. कचारगड यात्रेत येणारे भाविक आपल्या प्रथा परंपरेनुसार नैसर्गिक पूजा करतील आणि जातील. यात त्यांना कुठल्याही प्रकारची गर्दी करता येणार नाही. यासाठी इतर प्रांतातून आलेले भाविक गरज पडल्यास रात्री मुक्काम करु शकतील. 
यात्रेसाठी शासनाच्या परवानगीची वाट 
येत्या २५ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान चालणाऱ्या कचारगड यात्रेची परवानगी मिळावी म्हणून कचारगड देवस्थान समितीने प्रशासनाकडे अर्ज केला आहे. परंतु आतापर्यंत परवानगी मिळाली नसून आदिवासी भाविक काहीसे अस्वस्थ झाले आहेत. पारंपरिक देवपूजा खंडित होऊ नये म्हणून समितीतर्फे सतत प्रयत्न केले जात आहेत. परवानगी मिळाली तरी येणाऱ्या भाविकांना थांबविणे अशक्य आहे. माघ पौर्णिमानिमित्त भाविक येऊन आपली पारंपरिक नैसर्गिक पूजा करणारच. अशात प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही अटींच्या आधारे परवानगी देणे योग्य ठरेल. गुरुवारी (दि.१८) तहसील कार्यालयात समितीला पाचारण करुन सभा घेण्यात येईल. यावेळी वरील बाबीवर चर्चा केली जाईल व परवानगीबाबत निर्णय घेतला जाईल. 

 

Web Title: There will be no performances from the stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.