शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एका जागेमागे १० उमेदवारांची होणार लेखी परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2024 17:51 IST

११०० उमेदवारांची निवड : १५ जुलैला होणार लेखी परीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर पोलिस शिपाई संवर्गात रिक्त असलेल्या एकूण ११० पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत एका जागेसाठी १० उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे. यासाठी ११० जागा गोंदिया जिल्ह्यात असून, यासाठी ११०० उमेदवारांची निवड लेखी परीक्षेसाठी करण्यात आली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील ११० जागांसाठी १९ जून ते ५ जुलै २०२४ पर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्या आधारे महाराष्ट्र पोलिस शिपाई (सेवा प्रवेश) नियम २०११ व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा यामधील नियम ४ (२) नुसार शारीरिक चाचणीत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची संबंधित प्रवर्गातील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठी निवड यादी पोलिस मुख्यालय गोंदिया (कारंजा) येथील नोटीस बोर्डावर तसेच गोंदिया जिल्हा पोलिस दलाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली.

आक्षेप नोंदविण्याचा आज शेवटचा दिवसलेखी परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीत कुणाला हरकती / आक्षेप असल्यास त्यांनी पोलिस अधीक्षक गोंदिया यांच्या कार्यालयाचे ई-मेल sp.gondia@mahapolice.gov.in यावर लेखी स्वरुपात ११ जुलैच्या रात्री ८ वाजेपर्यंत सविस्तर आक्षेप कारणांसह नोंद करावे. त्यानंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती आक्षेप विचारात घेतले जाणार नाही, असे पोलिस विभागाने कळविले आहे. 

फुलचूरच्या आयटीआय येथे होणार लेखी परीक्षा११० पदांसाठी होणाऱ्या पोलिस भरतीची लेखी परीक्षा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), फुलचूर पेठ, गोंदिया येथे १५ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी हॉल तिकिटासह लेखी परीक्षेकरिता दुपारी १:३० वाजता प्रत्यक्ष हजर राहावे, असे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी कळविले आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रgondiya-acगोंदिया