शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सोमवारी येणार २५ लाख बारदाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 06:00 IST

जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते.यंदा शासनाने धानाला १८३५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने धानाला प्रती क्विंटल ५०० बोनस आणि हिवाळी अधिवेशना दरम्यान अतिरिक्त २०० रुपये हमीभाव जाहीर केला.

ठळक मुद्देसंडे अँकर। शेतकऱ्यांची कोंडी होणार दूर, खरेदीची अडचण मार्गी, निधीची मात्र प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्ह्यातील ६६ शासकीय धान खरेदी केंद्रावर मागील आठ दिवसांपासून बारदान्याचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे धान खरेदी ठप्प होण्याची शक्यता होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने त्याची दखल घेत कलकत्ता येथून २५ लाख बारदाना मागविला. हा बारदाना जिल्ह्यातील सर्व शासकीय केंद्रावर सोमवारी (दि.२०) पोहचणार असल्याची माहिती आहे.जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते.यंदा शासनाने धानाला १८३५ रुपये हमीभाव जाहीर केला. त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने धानाला प्रती क्विंटल ५०० बोनस आणि हिवाळी अधिवेशना दरम्यान अतिरिक्त २०० रुपये हमीभाव जाहीर केला. धानाला सर्व मिळून २५०० रुपये प्रती क्विंटल दर मिळत असल्याने आणि मागील वर्षीच्या तुलनेत धानाचे उत्पादन अधिक झाल्याने धान खरेदी केंद्रावर आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.आत्तापर्यंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने १५ लाख क्विंटल आणि आदिवासी विकास महामंडळाने ४ लाख क्विंटल धान खरेदी केला आहे.मात्र ज्या प्रमाणात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची आवक सुरू आहे.त्या तुलनेत खरेदी केंद्रावर बारदान्याचा पुरवठा करण्यात आला नाही. शासनाने फेडरेशनला बारदाना उपलब्ध करुन न दिल्याने ही समस्या निर्माण झाली होती. शासनाने कलकत्ता येथील जूट संचालकाकडून बारदाना मागविला आहे. मात्र तो वेळेत पोहचल्याने फेडरेशनची धान खरेदी ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली होती. तर अनेक शेतकऱ्यांचा धान बारदान्याअभावी खरेदी केंद्रावर पडून होता. अवकाळी पावसाचा या धानाला फटका बसून नुकसान होते. त्यामुळे धान विक्रीसाठी नेणारे शेतकरी संकटात आले होते. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर त्याची जिल्हाधिकारी आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने गांर्भियाने दखल घेत कलकत्ता येथून जूट संचालकाकडून २५ लाख बारदाना तातडीने मागविला. हा बारदाना कलकत्ता येथून रवाना झाला असून सोमवारी तो जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्रावर पोहचणार असल्याचे जिल्हा मार्केटिंग विभागाच्या अधिकाºयांनी लोकमतशी बोलताना सांगितले.महामंडळाच्या धानाला ताडपत्र्यांचाच आधारआदिवासी विकास महामंडळाच्या शासकीय धान खरेदी केंद्रावर आत्तापर्यंत ४ लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी करण्यात आला आहे. मात्र या धानाला ठेवण्यासाठी गोदामाची व्यवस्था अद्यापही करुन देण्यात आली नाही. त्यामुळे खरेदी केलेला सर्व धान महामंडळाच्या केंद्राबाहेर ताडपत्र्या झाकून तसाच पडला आहे.अवकाळी पावसाचे संकट कायमजिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून शनिवारी सकाळी काही भागात तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर उघड्यावर असलेल्या लाखो क्विंटल धानाला फटका बसण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.चुकाऱ्यांसाठी ३० कोटींचा निधीशासनाकडून जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला मागील महिनाभरापासून निधी न मिळाल्याने जिल्ह्यातील शेतकºयांचे १०० कोटी रुपयांचे चुकारे थकले होते. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक कोंडी झाली होती. लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर शासनाने शुक्रवारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. मात्र यानंतरही ७० कोटी रुपयांचे चुकारे शिल्लक आहे. तर धान खरेदी केंद्रावर अद्यापही मोठ्या प्रमाणात धानाची आवक सुरुच आहे. त्यामुळे निधीची पुन्हा गरज आहे. त्यामुळे शासन यावर नेमका काय तोडगा काढते याकडे लक्ष आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड