शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी गौण खनिजाची व्यवस्थाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 06:00 IST

मात्र १३ महिन्याच्या कालावधीत या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे अर्धे काम सुध्दा पूर्ण झाले नाही. तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी कंत्राटदाराने या रस्त्याला पर्यायी रस्ता तयार करुन देण्याची गरज होती. मात्र तसे केले नाही.उलट सिमेंटीकरणासाठी रस्ता खोदून त्यावर भिसी मुरूम टाकून पिचिंगचे काम सुरू केले.

ठळक मुद्देवाहन चालकांना फटका : गोरेगाव-गोंदिया राज्य महामार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोरेगाव-गोंदिया या राज्य महामार्गाचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे. मात्र कंत्राटदाराच्या गलथान कारभारामुळे हा मार्ग अपघाताला आमंत्रण देणार ठरत आहे. रस्त्याच्या काम नियोजित वेळी पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने पावसाळ्यापूर्वीच मुरूम आणि इतर गौण खनिजाची व्यवस्था करण्याची गरज होती. मात्र तसे न केल्याने वाहन चालक आणि नागरिकांना चिखलातून वाहन चालवावी लागत आहे.गोरेगाव ते गोंदिया या ८५ कोटी रुपयांच्या रस्ता सिमेंटीकरणाचे राज्य मार्गाचे काम मागील वर्षभरापासून एका कंत्राटदारामार्फत सुरू आहे.हे काम कंत्राटदाराला दीड वर्षात पूर्ण करायचे होते. मात्र १३ महिन्याच्या कालावधीत या रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे अर्धे काम सुध्दा पूर्ण झाले नाही. तर पावसाळा सुरू होण्यापूर्वी कंत्राटदाराने या रस्त्याला पर्यायी रस्ता तयार करुन देण्याची गरज होती. मात्र तसे केले नाही.उलट सिमेंटीकरणासाठी रस्ता खोदून त्यावर भिसी मुरूम टाकून पिचिंगचे काम सुरू केले. याच दरम्यान दमदार पाऊस झाल्याने रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे १४ कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी वाहन चालक आणि नागरिकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. सिमेंटीकरणासाठी हा रस्ता काही ठिकाणी खोदण्यात आला आहे.त्यामुळे रात्रीच्या वेळेस ते वाहन चालकाच्या लक्षात येत नसल्याने या ठिकाणी अपघात होत आहे. तर रस्त्याचे एका बाजुचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या बाजुचे काम सुरू करण्याची गरज होती. मात्र तसे न केल्याने याचा वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. गोरेगाव-गोंदिया या रस्त्याच्या दुर्दशेमुळे अनेक वाहन चालकांनी तर या मार्गाने जाणेच बंद केले. रस्त्याच्या दुर्दशेबद्दल अनेक नागरिकांनी कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात त्यांनी धन्यता मानली. नागरिकांमध्ये याबाबत संताप असताना सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींनी सुध्दा याची दखल घेतली नाही. त्यामुळे कंत्राटदाराचे वजन किती हे सुध्दा दिसून आले. 

टॅग्स :Rainपाऊस