शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पर्यावरण रक्षणासाठी मनुष्याने आपल्या सवयी बदलविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2017 00:27 IST

मनुष्याने निसर्गाला फार हानी पोहचवलेली आहे. त्याचेच वाईट परिणाम आज दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मनुष्याने निसर्गाला फार हानी पोहचवलेली आहे. त्याचेच वाईट परिणाम आज दिसून येत आहे. कोणत्याही गोष्टीचा अति गैरवापर करणे नुकसानकारकच ठरते. आज मानवाने आपल्या जीवनात प्लास्टिकचा एवढा वापर केला आहे की, मानवी जीवनावर प्लास्टिकचे साम्राज्य निर्माण केले आहे. प्लास्टिक रस्त्यावर टाकल्यामुळे ते गाई-म्हशी सेवन करतात व त्यापासून मिळणाऱ्या दुधाचा मानव वापर करतात व त्यामुळे मानवाच्या जीवनावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर मानवाने आपल्या सवयीमध्ये बदल करावयास पाहिजे. सध्याच्या युगामध्ये वातानुकुलित यंत्राचा वापर फार जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येते. परंतू एसीमुळे निघालेल्या वायुचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखावयाचा असेल तर मानवाने आपल्या सवयीमध्ये बदल करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग व जिल्हा वकील संघाच्या संयुक्तवतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजीत कायदेविषयक साक्षरता शिबिराच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष टी.बी.कटरे, वन अधिकारी बडगे, सह दिवाणी न्यायाधीश पी.बी.भोसले, अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, वनसंरक्षक मेश्राम, पीएलव्ही आशा ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष कटरे यांनी, जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना १९७२ पासून अस्तित्वात आली. पर्यावरण चांगले राहण्यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. पर्यावरणाकरीता आपण स्वत:च्या घरापासून सुरुवात करावी असे सांगितले. वन अधिकारी बडगे यांनी, पर्यावरण म्हणजे मानवासोबत सजीवसृष्टी, आजुबाजूचे वातावरण, एकमेकांशी होणारी क्रि या होय. बाहेरचे तापमान वाढते तेव्हा माणूस बेचैन होते. प्रदूषणाविषयी कायदे इंदिरा गांधी यांनी आमलात आणले असे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हा न्यायाधीश माधुरी आनंद, सह दिवाणी न्यायाधीश भोसले व अतिरिक्त जिल्हाधिकारी मोहिते यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्र मास वनसंरक्षक मेश्राम, जिल्हा न्यायालय वकील संघाचे सदस्य, जिल्हा विधी सेवा समितीचे सदस्य, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात उपवनसंरक्षक युवराज यांनी स्वच्छ हवा व पाणी मिळण्याकरीता वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले. आभार सहायक उपवनसंरक्षक यु.टी.बिसेन यांनी मानले.