शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

वाहनांमध्ये कोंबून विद्यार्थ्यांची वाहतूक पुन्हा झाली सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 23:00 IST

शहरातील विवेक मंदिर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी व्हॅन नवीन बायपास रोडवर रस्त्याच्या खाली उतरून डबक्यात उलटली होती. सुदैवाने या अपघातात काही अप्रिय घडले नाही व सर्व विद्यार्थी सुखरूप होते. मात्र, या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनाला धसका बसला होता. तर पालक त्यांच्या पाल्यांना घेऊन चिंतीत झाले होते.

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असलेली स्कूल व्हॅन रस्त्याशेजारी डबक्यात उलटल्याची घटना २० ऑगस्ट रोजी घडली होती. या घटनेनंतर वाहतूक नियंत्रण शाखेने त्या मार्गावर बंदोबस्त लावून पाचपेक्षा जास्त विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली होती. आतापर्यंत हा क्रम चालला. मात्र, मागील काही दिवसांपासून परत विद्यार्थ्यांना कोंबून वाहतूक सुरू झाल्याचे दिसत आहे. यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेची कारवाई फक्त ‘चार दिन की चांदनी’च ठरल्याचे बोलले जात आहे. शहरातील विवेक मंदिर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी व्हॅन नवीन बायपास रोडवर रस्त्याच्या खाली उतरून डबक्यात उलटली होती. सुदैवाने या अपघातात काही अप्रिय घडले नाही व सर्व विद्यार्थी सुखरूप होते. मात्र, या घटनेमुळे शाळा व्यवस्थापनाला धसका बसला होता. तर पालक त्यांच्या पाल्यांना घेऊन चिंतीत झाले होते. यावर पोलिस विभागाने लगेच कडक पाऊल उचलले व वाहतूक नियंत्रण शाखेकडून बायपास रोडवरील राजा भोज चौकात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. हे पोलिस पाचपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत होते. परिणामी विद्यार्थ्यांना कोंबून त्यांची वाहतूक बंद होती. मात्र, दोन-अडीच महिन्यांतच परिस्थिती जैसे थे झाली आहे. कारण ­दिवाळीनंतर आता शाळा सुरू झाल्या असून, वाहनांत विद्यार्थी परत एकदा कोंबून नेले जात असल्याचे दिसत आहे. यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेला २० ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेचा विसर पडला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यामुळेच विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांनी परत एकदा आपली मनमर्जी सुरू केल्याची दिसते. यात मात्र विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होत आहे. 

कित्येकदा घडले असले अपघात - २० ऑगस्ट रोजी स्कूल व्हॅनचा घडलेला अपघात हा काही पहिलाच अपघात नव्हता. यापूर्वी आणखीही अपघात घडले आहेत. अशात एकतर वाहनचालकांनी खबरदारीने वाहन चालविणे गरजेचे आहे. शिवाय, त्यांच्याकडून नियम मोडला जात असल्यास पोलिस विभागाने नजर ठेवणे गरजेचे आहे. मात्र, तसे होत नसल्याने अपघात घडत आहेत.

थोड्या अंतरावर उतरविले जात होते विद्यार्थ्यांना राजा भोज चौकात पोलिसांचा बंदोबस्त असल्याने विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहन चालक त्यांना चौकापासून थोड्या अंतरावर गाडीतून उतरवित होते. त्यानंतर त्यातील ५-५ विद्यार्थ्यांना बसवून शाळेत सोडत होते. तर काही विद्यार्थी पायी-पायीच शाळेत जात असल्याचेही दिसत होते. आतापर्यंत हाच प्रकार सुरू होता. मात्र, दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या असून, आता पाचपेक्षा जास्त विद्यार्थी बसवून त्यांची ने-आण सुरू आहे. 

 

टॅग्स :Studentविद्यार्थीEducationशिक्षण