शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
3
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
4
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
5
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
6
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
7
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
8
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
9
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
10
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
11
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
12
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
14
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
15
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
16
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
17
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
18
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
19
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
20
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम

मुलाने मद्यपी बापाला बुक्की मारून संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 16:16 IST

खैरबोडी येथील घटना : दारूचे व्यसन जीवावर बेतले

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : दारुड्या बापासोबत झालेल्या झटापटीत हातातील कडा डोक्यावर लागून बापाचा जागीच जीव गेला. तिरोडा तालुक्यातील ग्राम खैरबोडी येथे रविवारी (दि.२९) पहाटे १.३० वाजता दरम्यान ही घटना घडली. रमेश पारधी (५०, रा. खैरबोडी) असे मृताचे नाव आहे.

खैरबोडी येथील रमेश पारधी हा पत्नी चंद्रकला पारधी (४७), थोरला मुलगा आनंद पारधी (२४) व धाकडा मुलगा अंकुश पारधी (२२) यांच्यासोबत राहत होता. रमेश पारधी दारूचा व्यसनी होता व नेहमी पत्नी चंद्रकला व थोरला मुलगा आनंद यांच्यासोबत भांडण करून त्यांना मारहाण करीत होता. अनेकदा दारूच्या नशेत तुम्ही माझ्या घरातून निघून जा, असे रमेश बोलत होता. शनिवारी (दि.२८) दुपारी चंद्रकला हिच्याशी भांडण झाल्याने ती घरातून निघून गेली. तेव्हा आनंद कामानिमित्त बाहेर गेला होता. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास रमेश दारू पिऊन घरी आला. तेव्हा घरात अंकुश एकटाच होता. रमेशने त्याला त्याची आई कुठे गेली असे विचारून शिवीगाळ केली व पुन्हा घरातून बाहेर गेला. त्यानंतर रात्री ११.३० वाजता रमेश पुन्हा दारू पिऊन घरी आला. त्यानंतर त्याने पुन्हा अंकुश सोबत भांडण केले. 

दरम्यान, थोड्या वेळानंतर आनंद घरी आला असता रमेशने त्याच्यासोबतही भांडण सुरू केले. रविवारी (दि.२९) पहाटे १.३० वाजतापर्यंत दोघांचे आपसात भांडण सुरू होते. यात रमेशने आनंद याला 'तुझी आई घरातून निघून गेली. तुम्ही तिला कुठेतरी लपवून ठेवले' असे बोलून थापडबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावर आनंदने सुद्धा रमेशला शिवीगाळ करून थापडबुक्क्यांनी मारहाण केली. याच झटापटीत त्याच्या हातात असलेला धातूचा कडा रमेशच्या डोक्यावर लागल्याने तो खाली पडला. त्याच्या डोक्यातून व नाकातून रक्तस्त्राव होत असताना अंकुश याने त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो पाणी पित नव्हता व बोलतही नव्हता व त्याचा मृत्यू झाला होता. यावर चंद्रकलाने गावातील नागरिक व नातेवाइकांना फोन करून या घटनेबद्दल सांगितले. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संजय कवडे करीत आहेत. 

रात्रीच केली आनंदला अटक चंद्रकला हिने गावातील नागरिक व नाते- वाइकांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर लोकांनी पोलिसांना घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. तसेच रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आरोपी आनंद पारधी याला अटक केली. त्याला सोमवारी (दि.३०) न्यायालयात हजर करण्यात आले. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया