शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आजपासून राबविली जाणार जिवंत सातबारा मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 17:22 IST

मृत खातेदारांच्या वारसांची होणार नोंद : महसूल गावात चावडी वाचन

अमरचंद ठवरे लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : महसूल विभागांतर्गत १०० दिवस कृती आराखडा अंतर्गत तालुक्यात १ एप्रिलपासून सर्व गावांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व सातबारा प्राप्त नागरिकांनी मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणीसाठी जिवंत सातबारा मोहिमेचा लाभ घ्यावा, असे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी कळविले आहे.

सातबारा अभिलेखामध्ये मृतक खातेदारांचे नाव आजही मोठ्या प्रमाणात आहे. जमिनीच्या सातबारावर मयतांचे नाव असल्याने त्यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या दस्तऐवजांमध्ये वारसांची नोंद ठराविक कालावधीत अधिकार अभिलेखांमध्ये नोंद न झाल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागते. शेतकरी सभासदांची होणारी अडचण लक्षात घेऊन संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा निर्णय शासन स्तरावरून घेण्यात आला आहे. सातबारा वरील मृतक खातेदारांच्या वारसांच्या नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व वारस नोंदी घेऊन सातबारा अद्ययावत करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे. तालुक्यात सर्वच गाव पातळीवर जिवंत सातबारा मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी स्थानिक उपविभागीय अधिकारी वरून कुमार शहारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी ग्राम महसूल अधिकारी तसेच मंडळ अधिकारी यांच्या सहकाऱ्यांनी महसूल यंत्रणा सज्ज आहे.

या कालावधीत घेणार नावांची नोंद२१ एप्रिल ते १० मे पर्यंत तलाठ्यांनी ई फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करून मंडळ अधिकारी १९६६ च्या विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी वारस फेरफार वर शिक्कामोर्तब करून सातबारा दुरुस्त करून जिवंत व्यक्तींच्या नावाची नोंद घेणार आहे.

असा राहणार कालबद्ध कार्यक्रमतालुक्यातील सर्व मृतक खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखांमध्ये अद्ययावत करून मृतक खातेदारांच्या वारसांच्या नोंदीचे कामकाज गाव स्तरावरून करण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे. १ एप्रिल ते ५ एप्रिलपर्यंत तलाठी सांजा अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये चावडी वाचन करून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करण्यात येणार आहे. ६ एप्रिल ते २० एप्रिलपर्यंत वारसांना संबंधी मृत्यू दाखला, वारसांबाबत प्रतिज्ञा लेख, पोलिस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला तलाठ्याकडे सादर करून चौकशी अंतिम मंडळ अधिकारी यांच्यामार्फत वारस ठराव ही फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाgovernment schemeसरकारी योजना