शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अर्धनग्न अन् चेहरा जळालेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह; गोंदियात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2022 18:51 IST

महादेव पहाडीवर अर्धनग्न अवस्थेत आणि जळालेल्या स्थितीत तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकुंभारटोली जंगल परिसरातील घटना

आमगाव (गोंदिया) : तालुक्यातील कुंभारटोली पाऊडदौना मार्गावरील महादेव पहाडी जंगल परिसरात एका १५ ते १७ वर्षीय मुलीचा अर्धनग्न जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. तरुणीवर अत्याचार व नंतर हत्या करून ओळख पटू नये म्हणून आरोपींनी चेहरा जाळण्याचा प्रयत्न केल्याचा कयास लावला जात आहे. ही घटना गुरुवारी (दि. २१) सकाळी उघडकीस आली.

आमगाव शहराला लागून असलेल्या कुंभारटोली पाऊडदौना रोडवरील महादेव पहाडी परिसर जंगलाने व्यापलेला आहे. दररोज सकाळी गावातील नागरिक मॉर्निंग वॉक करण्यासाठी तर काही लोक कुडव्याची फुले तोडण्यासाठी, सरपण गोळा करण्यासाठी येथे येतात. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी कुंभारटोली गावातील काही लोक जंगल परिसरात सरपण गोळा करण्यासाठी गेले असताना गावकऱ्यांना एका तरुणीचा अर्धनग्न मृतदेह आढळला. याची माहिती त्यांनी लगेच आमगाव पोलिसांना दिली.

माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आमगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असावी, असा अंदाज लावला जात आहे. या तरुणीवर अत्याचार करून नंतर हत्या करण्यात आली असावी व ओळख पटू नये म्हणून तोंडावर दुपट्टा टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा अंदाज घटनास्थळावरील स्थितीवरून लावला जात आहे. या घटनेचा तपास आमगाव पोलीस करीत आहेत.

श्वान पथकाला केले पाचारण

महादेव पहाडीवर अर्धनग्न अवस्थेत आणि जळालेल्या स्थितीत तरुणीचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तरुणीचा चेहरा जळालेला असल्याने तिची ओळख पटविणे कठीण जात आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले होते.

तरुणीची ओळख पटविण्याचे आव्हान

तरुणीचा चेहरा पूर्णपणे जळालेला असल्याने तिची ओळख पटविण्यासाठी पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आपली सर्व सूत्रे हलविली असून, यातील आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूamgaon-acआमगाव