शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

डेंग्यूचा मच्छर पिच्छा काही सोडेना; दीड महिन्यात ३३ रुग्ण

By कपिल केकत | Updated: November 23, 2023 19:04 IST

पावसाळा संपूनही धोका मात्र कायमच, पावसाळ्यात सर्वाधिक आजार बळावत असून, पाण्यापासून ते खाण्यापर्यंत सर्वच बाबींकडे बारीक लक्ष द्यावे लागते.

गोंदिया : पावसाळ्यात डासजन्य आजार जास्त फोफावतात, असे दिसून येत असले तरी आता पावसाळा संपला असूनही डेंग्यूचा धोका काही कमी झालेला दिसून येत नाही. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमधील २१ तारखेपर्यंत म्हणजेच दीड महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ३३ डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत. यावरून पावसाळा संपूनही डेंग्यूचा धोका काही कमी झालेला नसून, डेंग्यूचा मच्छर जिल्हावासीयांचा पिच्छा काही सोडेना, असे म्हणावे लागणार आहे.

पावसाळ्यात सर्वाधिक आजार बळावत असून, पाण्यापासून ते खाण्यापर्यंत सर्वच बाबींकडे बारीक लक्ष द्यावे लागते. असे असतानाच जिल्हावासीयांची डासांपासून सुटका नसल्याने त्यांच्या विषारी डंकाचा सामना करावा लागतो. हेच कारण आहे की, जिल्ह्यात दरवर्षी मलेरिया व डेंग्यूचा शिरकाव होऊन तो चांगलाच फोफावतो. यंदाही जिल्ह्यात मलेरिया व डेंग्यूचा शिरकाव झाला. जिल्हावासीयांना त्यांचा सामना करावा लागला. ऑक्टोबरपासून पावसाने जिल्हा सोडला. त्यानंतर डासजन्य आजारांचा प्रकोप कमी होणार असे वाटत होते. मात्र, याउलट परिस्थिती असून, पावसाळा संपूनही डासजन्य आजारांचा धोका काही कमी झालेला नाही.

जिल्ह्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर या दीड महिन्यांच्या कालावधी डेंग्यूचे तब्बल ३३ रूग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ऑक्टोबर महिन्यात २८ तर नोव्हेंबर महिन्यात २१ दिवसांत पाच रूग्ण आढळून आले आहेत. यावरून पावसाळा नसला तरी मच्छर काही पिच्छा सोडणार नाही हेच दिसून येते.

गोंदिया तालुक्यात जास्त धोकायंदा डेेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण गोंदिया तालुक्यातच आढळून आले आहेत. आता ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातही हाच प्रकार कायम असल्याचे दिसले. कारण, ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात २८ रुग्ण आढळून आले असून, त्यात १० रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. नोव्हेंबर महिन्यात पाच रुग्ण आढळून असून, सुदैवाने गोंदिया तालुक्यात एकही रुग्ण नाही.

सप्टेंबर महिन्यात केला कहर

यंदा मलेरिया व डेंग्यूचा सर्वाधिक कहर सप्टेंबर महिन्यात दिसून आला. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात डेंग्यूचे ७१ रुग्ण आढळून आले होते. यात गोंदिया शहरातील आठ, तर गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १५ रुग्ण होते. त्यानंतर रुग्णांचे प्रमाण कमी होत गेले. मात्र, पावसाळा संपूनही ऑक्टोबर महिन्यात तालुक्यातच १० रुग्ण आढळल्याने धोका काही संपलेला नाही, असेच म्हणावे लागणार आहे.

ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील रुग्ण तालुकानिहायतालुका -ऑक्टोबर- नोव्हेंबर

गोंदिया- १०-००तिरोडा- ००-०१

आमगाव- ०४- ०२गोरेगाव- ०४-००

देवरी-०१-००सडक-अर्जुनी- ०६-०१

सालेकसा- ०३-००अर्जुनी-मोरगाव-००-००

गोंदिया शहर- ००-०१तिरोडा शहर- ००-००

डेंग्यू रुग्णांची महिनानिहाय आकडेवारी

महिना- रुग्णजानेवारी ते जुलै- २६

ऑगस्ट- ५३सप्टेंबर- ७१

ऑक्टोबर- २८२१ नोव्हेंबर- ०५