शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाने बोलावलंय, दुर्लक्ष करू नका, अन्यथा होईल तुरुंगवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 15:14 IST

पोलिस राबविताहेत वॉरंट अभियान: गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर वचक ठेवण्यासाठी पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : पोलिस प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध विविध प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात येतात. गुन्ह्याच्या तपासाअंती न्यायप्रक्रियेकरिता प्रकरण न्यायालयात सादर करण्यात येतात. न्यायालयाने प्रकरणांच्या सुनावणीकरिता गुन्ह्यातील प्रत्यक्ष साक्षीदार, आरोपींना न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स, वॉरंट बजावल्यास तत्काळ न्यायालयात हजर व्हा, अन्यथा समन्स व वॉरंटद्वारे साक्षीदार किंवा आरोपी हजर न झाल्यास आपल्याला पकडण्याचे वॉरंट निघेल अन् आपल्याला पोलिस पकडतील.

न्यायालयातील प्रकरणांची निर्गती करण्याकरिता न्यायालयाद्वारे काढण्यात येणारे समन्स, वॉरंटवरसुद्धा काही साक्षीदार, आरोपी दिलेल्या तारखेवर हजर राहत नाही. परिणामी न्यायालयात प्रकरणांच्या सुनावणीकरिता विलंब होतो. परिणामी गुन्हेगार सुटण्याचे प्रमाण वाढते. याला पायबंद व्हावा, तसेच दाखल गुन्ह्यातील साक्षीदार, आरोपींनी न्यायालयात दिलेली तारीख, वेळेवर हजर राहावे, अन्यथा आपल्याला न्यायालय दंडीत करू शकते.

जिल्हा पोलिसांकडून न्यायालयाद्वारे काढण्यात येणाऱ्या समन्स, वॉरंट बजावणीचे काम युद्धपातळीवर राबविण्यात येणार आहे. यापुढे आता न्यायालयाचे समन्स, वॉरंट टाळणे महागात पडणार आहे.

न्यायालयाने बोलाविल्यास तत्काळ जावे कोणत्याही प्रकरणात न्यायालयाने गुन्ह्यातील प्रत्यक्ष साक्षीदार, आरोपींना न्यायालयात हजर राह- ण्याबाबत समन्स, वॉरंट बजावल्यास तत्काळ न्यायालयात हजर होणे अपेक्षित आहे. समस, वॉरंट बजावूनही साक्षीदार किंवा आरोपी न्यायालयात हजर न झाल्यास न्यायालयाचा अवमान करीत असल्याचे समजून त्यांना पोलिस पकडून तुरुंगात टाकतील.

दुर्लक्ष करू नका "जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यातील आरोपी, साक्षीदारांना न्यायालयाने समन्स, वॉरंटद्वारे न्यायालयात हजर राहण्याबाबत काढण्यात आलेल्या आदेशाच्या दिवशी हजर राहणे अनिवार्य आहे. यात टाळाटाळ करू नये अन्यथा आपणा विरुद्ध कायदेशीर कारवाई होऊन गुन्हे नोंदविले जाऊ शकतात. न्यायप्रणालीस व पोलिस प्रशासनास सहकार्य करावे." - गोरख भामरे, पोलिस अधीक्षक गोंदिया

टॅग्स :Courtन्यायालयgondiya-acगोंदिया