शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना पडला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा विसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 15:25 IST

अवैध होर्डिंगवर कारवाई नाही : नगर परिषदेवर नेमका कुणाचा दबाव

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तीन दिवसांपूर्वीच गोंदिया नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील अवैध होर्डिंग बॅनर दोन दिवसात हटविले जातील. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा या संदर्भात आदेश दिले असल्याचे सांगितले. मात्र दिवस उलटूनही अवैध होर्डिंग बॅनरवर नगर परिषदेने कारवाई केली नाही. त्यामुळे स्वष्ठाधिका नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा सुद्धा विसर पडल्याचे चित्र आहे.

गोंदिया शहरातील सर्वच प्रमुख चौकात आणि मोक्याच्या ठिकाणी अवैध होर्डिंग बॅनर लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. त्यामुळे स्वच्छ सुंदर गोंदिया शहर हे केवळ नावापुरतेच ठरत आहे. सध्यस्थितीत गोंदिया शहरातील प्रमुख चौक नव्हे गल्लीबोळात सुद्धा अवैध होर्डिंग बॅनरचे पीक आले आहे. यामुळे गल्लोगल्ली नेते तयार झाल्याचे चित्र आहे. 

होर्डिंग बॅनर लावण्यासाठी नगर परिषदेकडून परवानगी घेतली जात नसल्याने महसूल बुडत आहे. शिवाय शहराचे विद्रुपीकरण होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा यावरून शासन आणि प्रशासनाला फटकारल्यानंतर काही शहरांमध्ये कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली. 

यासंदर्भात गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रावार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुद्धा दोन दिवसात शहर होर्डिंगमुक्त होईल. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ही बाब गांभीर्याने घेतली असून कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले होते. मात्र याला आता तीन दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्यापही नगर परिषदेने शहरात अवैध होर्डिंग बॅनर लावणाऱ्यांवर कुठलीच कारवाई केली नाही. त्यामुळे न.प. मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचा सुद्धा विसर पडल्याचे चित्र आहे. 

जुने निघेना नवीनची पडतेय भर शहरात होर्डिंग बॅनर लावण्यासाठी नगर परिषदेची कुणीच परवानगी घेत नाही. तर त्यांच्यावर नगर परिषदेकडून सुद्धा कुठलीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे अवैधपणे होर्डिंग बॅनर लावणाऱ्यांची सुद्धा हिम्मत वाढत चालली आहे. जुने होर्डिंग बॅनर निघत नसून त्यात नवीन होर्डिंग बॅनरची भर पडत असल्याचे चित्र आहे. तर कारवाई न करण्यासाठी नगर परिषदेवर नेमका दबाव कुणाचा, असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदिया