शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

बोकड चोरून नेणाऱ्यांना अखेर पकडले; रावणवाडी पोलिसांची कारवाई

By नरेश रहिले | Updated: October 2, 2023 14:14 IST

काही तासात आरोपी जाळ्यात

गोंदिया : रावणवाडी पोलिसांनी बोकड चोरी करणाऱ्या आरोपींना अवघ्या काही तासात जेरबंद केले. बोकड चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल असा एकूण ५६ हजारांचा माल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई रविवारी करण्यात आली.

रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरपार येथील मंगल बाबुलाल मस्करे यांनी ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सुमारास त्यांचा मालकीचा पांढऱ्या रंगाचा, काळे ठिपके असलेला बोकड व इतर शेळ्या चारत असताना तीन व्यक्तींनी एका मोटारसायकलवर एमएच ३५ एएस ७९०२ वरून रावणवाडी ते बालाघाट रस्त्यावरून ६ हजार रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा बोकड चोरी करून नेला. यासंदर्भात रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम ३७९,३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

रावणवाडी पोलिसांच्या पथकाने मोटारसायकल. एमएच ३५ एएस ७९०२ चा पोलिस ठाणे परिसरात शोध घेऊन शिरपूर येथे रात्री १०:५७ वाजता त्या तिघांना पकडले. त्या आरोपींजवळून मोटारसायकल एमएच ३५ एएस ७९०२ किंमत ५० हजार व बोकड किंमत ६ हजार असा एकूण ५६ हजारांचा माल जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये यश योगेश करोशिया (१९) रा. चांदणी चौक, स्टॉप जवळ काटी हल्ली मुक्काम डब्लिंग कॉलनी गोंदिया, शक्ती आनंद कुवर (१९) डब्लिंग ग्राउंड गौतमनगर गोंदिया व काली मंदिर जवळ सिव्हिल लाईन गोंदिया येथील एक विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभाग विभागीय अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन रावणवाडीचे ठाणेदार पुरुषोत्तम अहेरकर, पोलिस हवालदार रंजित बघेले, सुबोध बिसेन, पोलिस नायक मलेवार यांनी केली आहे. तपास पोलिस हवालदार अरविंद चौधरी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया