शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्यातून सोडण्यासाठी १ लाख मागणाऱ्या ठाणेदाराच्या रायटरला केले निलंबित 

By नरेश रहिले | Updated: September 3, 2023 17:54 IST

ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंडकेपार रोड दुर्गा ट्रेडर्स कबाडीच्या गोदामात २१ जुलैच्या दुपारी १२ वाजता आदर्श अनिल विश्वकर्मा २५ रा. गणेशनगर गोंदिया या तरुणाला मारहाण करून त्याच्या जवळून १८ हजार रुपये रोख बळजबरीने हिसकावून घेतले.

गोंदिया: ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंडकेपार रोड दुर्गा ट्रेडर्स कबाडीच्या गोदामात २१ जुलैच्या दुपारी १२ वाजता आदर्श अनिल विश्वकर्मा २५ रा. गणेशनगर गोंदिया या तरुणाला मारहाण करून त्याच्या जवळून १८ हजार रुपये रोख बळजबरीने हिसकावून घेतले. त्या तरूणाला धक्काबुक्की करून त्यांच्या कबाडी दुकानाला कुलूप लावून दोन्ही बाजूच्या भिंतीवर ही जमीन आपल्या मालकीची असल्याचे दाखविणाऱ्या १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपी असलेल्या व्यक्तीला सोडण्यासाठी १ लाख रूपयाची मागणी गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यातील ठाणेदाराचा रायटर बिजेंद्र धनलाल बिसेन (बक्कल नंबर १६०८) यांनी केली होती. या प्रकरणाची तक्रार पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांच्याकडे करण्यात आली होती.

 या प्रकरणात त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, अनिल गयाप्रसाद विश्वकर्मा (५३) रा. गणेशनगर गोंदिया यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुर्गा ट्रेडर्स येथे कबाडीचे गोदाम त्यांनी तयार केले आहे. त्या जागेवर आरोपींनी आपला हक्क दाखवित असून तुम्ही आम्हाला २५ लाख रुपये द्या अन्यथा ती जागा आमची आहे आम्हाला परत करा असे बोलून आरोपी अरबाज उर्फ राजा अखिल शेख (३०), गणेश रामदयाल राऊत (२५), विनोद मेश्राम (३०) तिन्ही रा. गोंदिया व इतर १२ अशा १५ जणांनी त्यांना धमकाविले होते. २१ जुलै २०२३ रोजी आरोपीं त्यांच्या गोदामात गेले होते. त्यावेळेस आदर्श अनिल विश्वकर्मा (२५) हा तरुण गोदामात उपस्थित होता. गोदामातून त्याला धक्के मारून बाहेर काढले. गोदामाला कुलूप लावले. 

कबाडीचा व्यवसाय केल्यामुळे त्याच्या खिशात असलेले १८ हजार रुपये आरोपींनी घेतले. भिंतीवर ही जमीन आपल्या मालकीची आहे असे दाखवून तिथे आपल्या मोबाईल क्रमांक दर्शविला. या घटने संदर्भात गोंदिया ग्रामीण पोलिसात १५ आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३९५, ३२७, ३८५, ४५२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सचिन म्हैत्रे यांच्याकडे होता. त्यांचा रायटर बिजेंद्र धनलाल बिसेन (बक्कल नंबर १६०८) हा आरोपींसोबत काय बोलते हे माहित नव्हते. परंतु बिजेंद्र आपली पोळी शेकण्यासाठी आरोपींना गुन्ह्यातून सोडण्यासाठी त्यांच्याकडे १ लाख रूपयाची मागणी केल्याची चर्चा आहे. यासंदर्भात पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करण्यात आल्याने या तक्रारीवरून पोलिस अधिक्षक निखील पिंगळी यांनी त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. त्याची विभागीय चौकशी सुरूपोलीस हवालदार बिजेंद्र धनलाल बिसेन (बक्कल नंबर १६०८) याला निलंबित केल्यानंतर त्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीत काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागले आहे. रेकॉर्डींग असल्याची चर्चाया प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याने पैश्याची मागणी केलेली रेकॉर्डींग असल्याची चर्चा शहरात सुरू होती. त्या रेकॉर्डींगच्या आधारे त्याला निलंबित करण्यात आल्याचीही चर्चा होती. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारी