शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

बेरोजगारीची भीषण अवस्था ! डीएड, बीएड पदवीधर करताहेत 'रोहयोचे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 17:10 IST

Gondia : शिक्षण डीएड, बीएड; वय तीस अन् काम 'रोहयोचे'

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सद्यस्थितीत ४३८ ग्रामपंचायतींअंतर्गत सुरू असलेल्या २ हजार ९४२ कामांवर ९६ हजार ४१० मजूर काम करीत आहेत. आदिवासीबहुल नक्षलग्रस्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात उद्योगधंदे नसल्याने मनरेगा रामबाण उपाय आहे. परंतु मनरेगातूनही २.५० लाख मजुरांच्या हाताला काम न दिल्याने जिल्ह्यात बेरोजगारीत वाढ झाली आहे. मनरेगाच्या कामावर डीएड, बीएड अर्हताधारक तरुण काम करीत असल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारने बेरोजगारी दूर करण्यासाठी मागेल त्याला शंभर दिवस काम देण्याची हमी देणारी रोजगार हमी योजना अंमलात आणली. या योजनेतून वेगवेगळे लोकाभिमुख निर्णय घोषित केले जात आहेत. पण, कागदोपत्री मजुरांची संख्या दाखवून यंत्राच्या मदतीनेच बहुतांशी ठिकाणी कामे सुरू आहेत. यामुळे रोजगार हमी योजनेचा मजुरांच्या हाताला काम देण्याचा हेतू उद्देश पूर्ण होत नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात ४ लाख ६० हजार २५२ मजुरांनी जॉब कार्ड काढली आहेत. पण, त्यापैकी रोजगार हमीच्या कामावर ९६ हजार ४१० मजूर कार्यरत आहेत. अनेकांना कामाची प्रतीक्षा आहे, तर काहींनी केवळ जॉब कार्ड काढले नसून, त्यांना कामाची आवश्यकता नसल्याची माहिती आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम २००५ अंतर्गत गरिबांना जॉब कार्ड करून रोजगार देण्याची तरतूद आहे. वर्षातून शंभर दिवस केंद्राकडून कामाची हमी दिली जाते. परंतु काम दिले जात नाही.

२९४२ जिल्ह्यात ४३८ ग्रामपंचायतीं अंतर्गत २ हजार ९४२ कामे सध्या सुरू आहेत. ३१ प्रकारची कामे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केली जातात. त्यातील घरकुल, नाला सरळीकरण, खडीकरण याच कामावर मजूर दिसतात.

शेती नाही, नोकरी नाही, लग्न जमेनाशेती नाही, शिक्षण असूनही नोकरी मिळाली नाही त्यामुळे ३० ते ३५ वर्षाचे होऊनही मुलांचे लग्न जमत नाही. प्रत्येक मुलीचे वडील हा नोकरदार मुलगाच हवा असा अट्टाहास घेऊन बसल्याने तरुणांचे लग्न जुळत नाही.

कोणत्या तालुक्याततालुका                   जॉब कार्ड        मजूर उपस्थितीआमगाव                      ४२१६१               ६५९७सालेकसा                     ४२६०१               ०३८६ देवरी                           ५३८११              २०५०२सडक-अर्जुनी                ४७१८८              ७५३२अर्जुनी-मोरगाव              ६१८०३              १०८९४गोरेगाव                        ४६५०४               ८४०४तिरोडा                         ६९८३७              १८६०८गोंदिया                        ९६३४७              ९६४१०

बेरोजगारांची फौज, पण रोहयोच्या कामाला नापसंतीजिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची फौज उभी आहे. परंतु काही लोक शरमेने रोहयोच्या कामावर येण्यास तयार नाहीत. पेमेंट कमी द्या परंतु खुर्चीवर बसण्याचे कामे द्या असा सूर सुशिक्षित तरुणांचा आहे.

जॉब कार्ड ४.६० लाख, मजूर केवळ ९६ हजारगोंदिया जिल्ह्यात ३ लाख ६० हजार २५२ मजुरांनी जॉब कार्ड काढली आहेत. त्यापैकी रोजगार हमीच्या कामावर केवळ २६ हजार ४१० मजूर आहेत. अनेकांना कामाची प्रतीक्षा लागली आहे, तर काहींनी आवश्यकता नसताना कार्ड बनविल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :Unemploymentबेरोजगारीgondiya-acगोंदिया