शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अपडाऊनचे आमदारांना ‘टेंशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 06:00 IST

गोंदिया जिल्ह्याला नक्षलग्रस्त असा ठपका लागल्याने अधिकारी-कर्मचारी गोंदियाला येण्याचे टाळतात. शासनाने पाठविलेच तर कित्येक सुटी घेऊन बसतात किंवा नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वशिला लावून आपली बदली करवून घेतात. मात्र ज्यांच्याकडे हे शस्त्र नाहीत ते मात्र विदर्भ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसार आपलेही वेळापत्रक ठरवून जनता व कार्यालयाला सेवा देतात.

ठळक मुद्देतारांकीत प्रश्न लावला। ‘विदर्भ’ वीरांमुळे कामकाजावर परिणाम

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ विदर्भ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसार ठरते असे आता नागरिक बोलू लागले आहे. याचा परिणाम मात्र संबंधित विभागातील कामकाजावर होत असून सर्वसामान्य जनतेची फरफट होत आहे. ही बाब गांभीर्याने घेत आमदार विनोद अग्रवाल यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अपडाऊनचा मुद्दा तारांकीत प्रश्न लावून विधानसभेत मांडला आहे. त्यामुळे आता अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अपडाऊनवर काय कारवाई होते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.गोंदिया जिल्ह्याला नक्षलग्रस्त असा ठपका लागल्याने अधिकारी-कर्मचारी गोंदियाला येण्याचे टाळतात. शासनाने पाठविलेच तर कित्येक सुटी घेऊन बसतात किंवा नेते व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वशिला लावून आपली बदली करवून घेतात. मात्र ज्यांच्याकडे हे शस्त्र नाहीत ते मात्र विदर्भ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसार आपलेही वेळापत्रक ठरवून जनता व कार्यालयाला सेवा देतात. ही बाब सर्वश्रूत असून कित्येक अधिकारी व नेते आले नी गेले मात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या या वागणुकीवर काहीच औषध कुणालाही मिळाले नाही. परिणामी संबंधित कार्यालयांतील कामकाजावर त्याचा परिणाम होत असून ‘साहेब’ नसल्याने सर्वसामान्य जनतेला फक्त चकरा माराव्या लागतात. जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी विदर्भ एक्स्प्रेसला जास्त पसंती देतात. सकाळी ११.३० वाजता येणे व दुपारी २.५५ वाजता निघून जाणे हा त्यांचा नित्यक्रम झाला आहे. त्यातही दुसरा व चवथा शनिवार आल्यास शुक्रवारीच सुटी टाकणे हा प्रकार येथे सुरू आहे.वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरेने मात्र येथील आमदार विनोद अग्रवाल यांचे ‘टेंशन’ वाढविले आहे. लोकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी अधिकारी-कर्मचारी जागेवर असणे गरजेचे असल्याने त्यांनी हा गंभीर प्रश्न थेट विधानसभेत तांराकीत प्रश्न लावून मांडला आहे.विशेष म्हणजे, या विषयाला घेऊन येथील जिल्हाधिकाऱ्यांना शासनाच्या उपसचिवांनी पत्र पाठविले असून त्यांच्याकडून या प्रश्नाला घेऊन वस्तुस्थिती काय ते २४ तारखेपर्यंत कळविण्यास सांगीतले आहे. त्यामुळे आता प्रश्नाला घेऊन पुढे काय होते याकडे सर्वांच्या नजरा आहे.विदर्भ एक्स्प्रेस आवडती गाडीनागपूरवरून गोंदियाला येऊन पुन्हा नागपूरला जाण्यासाठी विदर्भ एक्स्प्रेस अत्यंत उपयुक्त अशी गाडी आहे. ही गाडी सकाळी ११.३० वाजतादरम्यान गोंदियाला येत असून दुपारी २.५५ वाजता पुन्हा नागपूरला जाते. त्यामुळे कुणीही येथील आपली कामे आटोपून याच गाडीने जाऊ शकतो. नेमका हाच फायदा अधिकारी-कर्मचारी घेत असून नागरपूवरून सकाळी याच गाडीने येतात. दुपारी २ वाजतापर्यंत कार्यालयात घालवून पुन्हा हीच गाडी पकडून ते नागपूर गाठतात. म्हणूनच विदर्भ एक्स्प्रेस अशा अपडाऊन बहाद्दरांची आवडती गाडी असून या अपडाऊन करणाºयांना यामुळेच ‘विदर्भवीर’ संबोधले जाते.

टॅग्स :MLAआमदारVidarbhaविदर्भ