शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

आॅनलाईन कामांवर शिक्षकांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:14 IST

जिल्ह्यातील शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची संगणक व इंटरनेट व्यवस्था उपलब्ध न करता शिक्षकांच्या पगार बिलांसह सांख्यिकीय व इतर सर्व माहिती मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन मागविली जात आहे.

ठळक मुद्देनिधीची व्यवस्थाच नाही : शिक्षक कृती महासंघाचे पालकमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची संगणक व इंटरनेट व्यवस्था उपलब्ध न करता शिक्षकांच्या पगार बिलांसह सांख्यिकीय व इतर सर्व माहिती मुख्याध्यापकांकडून आॅनलाईन मागविली जात आहे. त्यासाठी शासनाने आर्थिक निधीची कसलीही व्यवस्था न केल्याने त्याचा आर्थिक भार शाळांवर पडत आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरपासून आॅनलाईन कामांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा शिक्षक कृती महासंघाने दिला आहे.अनेकदा शाळांची माहिती आॅनलाईन करण्यासाठी ठराविक कालावधी दिला जातो. तेव्हा शाळेच्या वेळेसह इतर वेळी आनॅलाईन कामे करणाºया दुकानदारांकडे गेल्यानंतर आॅनलाईन व्यवस्था सुरळीत नसल्याने तासनतास तातकळत रहावे लागते. अशावेळी मानसिक त्रास सहन करावा लागतो.याबाबत शासनस्तरावरून पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, किंवा तालुकास्तरावरील डाटा आॅपरेटरकडून सदर काम करवून घेण्यात यावे, अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. परंतु याकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांची मानसिकता खराब होत चालली असून मुख्याध्यापक व शिक्षक शाळाबाह्य होवू लागले आहेत. तसेच आॅगस्ट २०१७ पासून मुख्याध्यापकांना शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्रत्येक महिन्याला दुकानदारांकडून उधारीवर किराणा सामान खरेदी करावा लागतो. ही उधारी दर महिन्याला वाढतच जाते. त्यामुळे गावपातळीवरील दुकानदार मुख्याध्यापकांना वेठीस धरत असल्याचे चित्र आहे. शासनाकडून मिळणारा पैसा कधीच नियमित मिळत नाही. सहा-सहा महिने मुख्याध्यापकांना वाट पाहावी लागते.या सर्व बाबींचा शालेय वातावरणावर विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे शालेय पातळीवर धान्य साठा किंवा किराणा सामान संपला असेत तर त्याची माहिती मुख्याध्यापक प्रशासनाला कळवित राहील. संबंधित कार्यालयाने संपूर्ण साठा पुरवित रहावे व शालेय पोषण आहार योजना सुरळीत सुरू ठेवावी. अन्यथा २० नोव्हेंबर २०१७ पासून धान्य व इतर किराणा सामान खरेदी केला जाणार नाही, असा इशारा सुध्दा संघटनेने दिला आहे.संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच पालकमंत्री व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. त्याच्या प्रतिलिपी जि.प. अध्यक्ष, शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, ग्रामविकास मंत्री व शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आले आहे. मागण्या मंजूर न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.प्रलंबित प्रश्न मार्गी लावाशिक्षक कृती महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात काही प्रलंबित प्रश्न सोडविण्याचीही मागणी करण्यात आली. यात जीपीएफ व डीसीपीएसची रक्कम खात्यावर जमा करावी, प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या वेतन पथकासाठी कायमस्वरूपी कर्मचारी द्यावा, शालेय पोषण आहार योजनांचे सामान खरेदीचे बिल अविलंब द्यावे, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, पदविधर शिक्षक, सहायक शिक्षक यांचे अचूक रोष्टर प्रकाशित करावे, निश्चित तारखेला दर महिन्याचे पगार सरळ शिक्षकांच्या खात्यात जमा करावे, पगार बिल तयार करण्याचे काम पं.स. शिक्षण विभागातूनच करून घ्यावे, महिला कर्मचाºयांचे दोन वर्षांपासूनचे प्रसूती बिल त्वरित काढावे तसेच प्रसूतीपूर्व प्रकरण नियमित पगाराकरिता पात्र करावे आदी अनेक मागण्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक