शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 20:32 IST

शेतकरी तसेच सर्व सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना राबविण्याचे आश्वासन देत केंद्र आणि राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आले. मात्र सत्तेवर येताच सरकारला जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतकरी व जनहित विरोधी धोरणामुळे जनतेचे हाल होत आहे. केवळ अच्छे दिन चे स्वप्न दाखवून जनतेची दिशाभूल करणाºया सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन माजीे खा. नाना पटोले यांनी केले.

ठळक मुद्देनाना पटोले : बाम्हणी येथे काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : शेतकरी तसेच सर्व सामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजना राबविण्याचे आश्वासन देत केंद्र आणि राज्यात भाजपा सरकार सत्तेवर आले. मात्र सत्तेवर येताच सरकारला जनतेला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. शेतकरी व जनहित विरोधी धोरणामुळे जनतेचे हाल होत आहे. केवळ अच्छे दिन चे स्वप्न दाखवून जनतेची दिशाभूल करणाºया सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याचे आवाहन माजीे खा. नाना पटोले यांनी केले.सडक अजुनी तालुक्यातील बाम्हणी खडकी येथे शेंडा जि.प.क्षेत्राच्या वतीने काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन माजी आ. रामरतन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आलोक मोहंती, तालुकाध्यक्ष शेषराव गिऱ्हेपुंजे, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष गायत्री इरले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निशांत राऊत, शिक्षण सभापती रमेश अंबुले, सभापती लता दोनोडे, जि.प.सदस्य सरिता कापगते, रत्नदीप दहिवले, जागेश्वर धनबाते, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष उषा शहारे, कृपासागर जनबंधू, युवा संकल्पचे संतोष वालदे, विलास कापगते, प्रकाश पुराम, मार्कंड परिहार, साधू लिल्हारे, हरिष तोडसकर, नितीन भालेराव, सरपंच सिंधू बारसागडे, दिपा गहाणे, प्रकाश मडावी, मोहन सुरसाऊत, माणिक घनाडे, पुष्पा खोटेले, भरत मडावी, जगदीप खंडाते, अंताराम मडावी उपस्थित होते. पटोले म्हणाले, केंद्र आणि राज्यातील सरकारला चार वर्षांचा कार्यकाळ लोटूनही सुशिक्षित बेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व छोट्या व्यावसायीकांना दिलासा मिळाला नाही. उलट त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जी.एस.टी.,नोटबंदी सारख्या अडचणींना गोरगरीबांना सामोरे जावे लागले.पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवून जनतेची लूट केली जात आहे. शेतकºयांना सरळ मार्गाने कर्जमाफी न देता आॅनलाईनचा तिढा समोर करुन सरकारने जनतेची आर्थिक पिळवणूक करीत आहे. तर कर्जमाफीचा घोळ अद्यापही संपलेला नसून शेतकरी अजुनही कर्जमाफीपासून वंचित आहेत. एकट्या महाराष्ट्रात मागील चार वर्षात बारा हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत.चारशे रुपयाचा गॅस सिलेंडर हजार रुपयांवर पोहचला आहे. स्वस्त धान्य दुकानातून गोरगरिबांना मिळणारे रॉकेल सुध्दा मिळणे बंद झाल्याने त्यांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे जनतेच्या भावनांशी खेळणाºया सरकारला जनतेची धडा शिकविण्याची गरज असल्याचे पटोले यांनी सांगितले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी मार्गदर्शन केले. या दरम्यान शेंडा जि.प. क्षेत्रांतर्गत येणाºया सरपंच, उपसरपंचाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रास्ताविक जि.प.सदस्य सरिता कापगते यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशांत राऊत यांनी केले तर आभार विलास कापगते यांनी मानले.