लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना लागणारे गौणखनिज करमुक्त करण्यात यावे, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी तळपदे यांना शनिवारी (दि.५) दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनातून तालुक्यातील २०७४ मंजूर घरकुलांना शासकीय दराने गौणखनिज खरेदी करणे अंदाजपत्रकीय किंमतीच्या चार पटीने महागात पडत आहे. त्यामुळे घरकुलांचे बांधकाम थांबले आहे. सदर लाभार्थी गरीब असून त्यांना लागणारे रेती, गिट्टी, विटा, मुरुम तलाठी सांझा व ग्रामपंचायत स्तरावरुन मोफत उपलब्ध करुन देण्यात यावे. अशी मागणी केली.२० जानेवारीपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तिरोडा येथील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे. शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष किरणकुमार बन्सोड, सभापती निता रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे, कैलास पटले, बाबुराव डोमळे, सरपंच बबन कुकडे, जि.प.सदस्या राजलक्ष्मी तुरकर, पिंटू चौधरी, मनोज रामटेके, राजकुमार ठाकरे, पं.स.उपसभापती मनोहर राऊत, देवेंद्र चौधरी, वसीम शेख, समिर बन्सोड,एल.बी.भंडारी, संतोष चौधरी, डॉ. किशोर पारधी,सुधाकर मेश्राम, वासुदेव वैद्य, कैलाश रामटेके, प्रदीप मेश्राम, अनिल मरस्कोल्हे, अशोक पटले, मुलचंद पटले, शैलेश सांगोळे, सुशिल कोटांगले, राजेंद्र फाये, डॉ. मुकेश पटले, कैलाश जांभुळकर यांचा समावेश होता.
घरकूल लाभार्थ्यांसाठी गौणखनिज करमुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 21:16 IST
तालुक्यातील घरकूल लाभार्थ्यांना लागणारे गौणखनिज करमुक्त करण्यात यावे, अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने उपविभागीय अधिकारी तळपदे यांना शनिवारी (दि.५) दिलेल्या निवेदनातून केली आहे.
घरकूल लाभार्थ्यांसाठी गौणखनिज करमुक्त करा
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन