शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
4
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
5
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
6
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
7
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
8
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
9
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
10
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
11
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
12
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
13
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
14
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
15
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
16
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
17
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
18
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
19
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
20
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

११ दिवसांत ३८ लाखांची करवसुली

By admin | Updated: January 31, 2015 23:23 IST

कर वसुलीचे ११ कोटींचे टार्गेट घेऊन सुरू करण्यात आलेल्या नगर परिषदेच्या कर वसुली मोहिमेला शहरात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच कर वसुली पथकाने

गोंदिया : कर वसुलीचे ११ कोटींचे टार्गेट घेऊन सुरू करण्यात आलेल्या नगर परिषदेच्या कर वसुली मोहिमेला शहरात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच कर वसुली पथकाने ११ दिवसांत ३७ लाख ५९ हजार ४९५ रूपयांची कर वसुली केली आहे. यात रोख व धनादेश स्वरूपात आलेल्या रकमेचा समावेश आहे. परिषदेच्या कर वसुली पथकाने १९ जानेवारीपासून कर वसुली मोहीमेला सुरूवात केली. सुरूवातीच्या काही दिवसांत शहरातील थकबाकीदारांकडून याला विरोध करण्यात आला. काही ठिकाणी तर हमरीतुमरीची परिस्थितीही निर्माण झाली होती. मात्र पालिकेने यंदा टार्गेट पूर्ण करण्यासाठी कंबर कसली असून विरोध करणाऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी दर्शविली. तर काही व्यापाऱ्यांच्या दुकानांना सील ठोकण्या पर्यंतची वेळ आली. यावर मात्र व्यापाऱ्यांनी नमते घेत आपल्याकडील थकीत रक्कम भरून दुकानाला सील लावण्याची पाळी टाळली. आता मात्र कर वसुली मोहीमेला चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच दिवसेंदिवस कर वसुलीचा आकडा वाढतच चालल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे मुख्याधिकारी सुमंत मोरे स्वत: कर वसुलीसाठी मैदानात उतरले असून पथकासोबत वसुलीसाठी जात आहेत. तर शहरातील तीन प्रतिष्ठीत ठिकाणांवर थकीत रक्कम भरण्यासाठी टोलवाटोलवी केली जात असल्याने पथकाने सील लावण्याची तयारी केली. मात्र पथक पोकळ धमक्या न देता खरोखरच सील लावत असल्याचे दिसून आल्याने अखेर समोरच्यांनी रक्कम भरून आपले सील लावण्याची कारवाई टाळली. सील लावण्यात येत प्रकार कानी पडत असल्यानेहीथकबाकीदारांचे धाबे दणाणल्याचे दिसून येत आहे. (शहर प्रतिनिधी)