शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या रक्षणार्थ सैनिकांचे कार्य अनन्यसाधारण

By admin | Updated: February 4, 2017 01:35 IST

अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. यापैकी एक गरज जरी कमी पडली तर आपण अस्वस्थ होतो.

अभिमन्यू काळे : ध्वजनिधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा गोंदिया : अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. यापैकी एक गरज जरी कमी पडली तर आपण अस्वस्थ होतो. शत्रूंचा हल्ला झाल्यास आपण मुलभूत गरजांपेक्षा सुरिक्षत राहण्याकडे लक्ष देतो. देशाच्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळे आज आपण सुरक्षित जीवन जगत आहोत. देशाच्या रक्षणार्थ लढणाऱ्या सैनिकांचे कार्य अनन्यसाधारण असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी काढले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ व माजी सैनिकांच्या मेळाव्याचे उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन दिपक लिमसे व देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हाधिकारी काळे यांनी, आपण आपल्या हक्कांबाबत लढत असतो. हक्क मागण्याचे जे अधिकार प्राप्त झाले ते सैनिकांमुळे. ते देशाच्या रक्षणासाठी कठीण परिस्थितीचा सामना करीत असतात. आपण त्यांच्यामुळे आज सुरिक्षत जीवन जगत असल्याचे सांगितले. तर डॉ.पुलकुंडवार यांनी, सैनिक त्याग करु न देशासाठी लढतात. त्यांच्या ऋणाची परतफेड करण्यासाठी अशाप्रकारचे कार्यक्र म आयोजित करण्यात येतात. देशासाठी वीर मरण आलेल्या सैनिकांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम करण्यात येत आहे. अशा कुटुंबांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी जास्तीत जास्त निधी संकलीत करु न त्यांना मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. जवळे यांनी, देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांचा त्याग महत्वाचा आहे. देशसेवा कठोरपणे करणाऱ्या सैनिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. त्यांच्या मदतीसाठी ध्वजदिन निधी संकलनाच्या कामास सर्वांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले. प्रास्ताविकातून कॅप्टन लिमसे यांनी ध्वजदिन निधीचे महत्व, सैनिकांसाठी असलेल्या योजना, पाल्यांच्या शैक्षणिक विकासाला हातभार लावण्यासाठी करण्यात येत असलेल्या मदतीबाबतची माहिती दिली. आभार कल्याण संघटक जगदिश रंगारी यांनी मानले. कार्यक्र माला माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता, त्यांचे कुटुंबिय व विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ाावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुणाने उत्तीर्ण झालेल्या आस्मा खान, तृप्ती बिसेन यांचा सत्कार तर गायत्री पटले, सोनू बांगरे, सुधांशू बावनथडे या माजी सैनिकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी मदत म्हणून प्रत्येकी २० हजार रु पयांचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. वीर पत्नी किरण पटले, राजश्री क्षीरसागर, वीर माता रुख्मीनी बिसेन यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तर जिल्ह्यात ध्वजदिन निधी संकलनाचे सन २०१६ या वर्षात उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा खनिकर्म अधिकारी भिमराव फुलेकर, सार्वजनिक न्यासच्या सहायक धर्मदाय आयुक्त ममता रेहपाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोंदिया, वन विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, सालेकसा व अर्जुनी/मोरगावचे दुय्यम नोंदणी निरिक्षक, तहसिलदार गोंदिया, अप्पर तहसिलदार गोंदिया, तहसिलदार गोरेगाव, सालेकसा, आमगाव, देवरी, तिरोडा व अर्जुनी/मोरगाव गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रतिनिधींचा पुष्पगुच्छ, भेटवस्तू, प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.