याप्रसंगी २१ जून रोजी जागतिक योग दिन का साजरा केला जातो? योग करण्याचे फायदे काय? तसेच कोरोना महामारीत योगाचे किती महत्त्व आहे याची सविस्तर माहिती ॲड. संगीता आव्हाड यांनी दिली व योगाचे प्रशिक्षण दिले. आपल्याला आपले शरीर सुदृढ व निरोगी ठेवायचे असेल तर आपणास नियमित योग करणे गरजेचे आहे. योग केल्याने आपल्या शरीरातील व्याधी संपुष्टात येऊन आपण एक उत्तम निरोगी आयुष्य जगू शकतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला शरीराबरोबर आपले मनदेखील प्रसन्न ठेवणे गरजेचे आहे, त्यासाठी योग हा अतिशय उत्तम उपाय आहे. योग ही काळाची गरज असून सर्वांनी योग मार्गाकडे वळावे जेणेकरून भविष्यात निर्माण होणाऱ्या आजारांपासून आपण नक्कीच दूर राहू शकू. आपण आतापासूनच लहान मुलांमध्ये योगाबद्दल प्रेम व त्यांचे महत्त्व काय आहे याचे बाळकडू दिले तर भविष्यात नक्कीच एक सुदृढ व सक्षम भारत निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी पराग गहाणे, अथर्व आव्हाड, संस्कृती साळवी, न्यायाधीश विक्रम आव्हाड, प्रा. डॉ. राजकुमार भगत, ॲड. ओ. एस. गहाणे, साहाय्यक अधीक्षक ए.एम. भालेराव, न्यायालयीन कर्मचारी पी.एस. डोंगरे, ए.पी. जांभुलकर, जी.आर. उपरीकर, आर.आर. मेश्राम, सी.एस. चौरागडे, आर.एस. पारधी, शांताराम बोडे, पी.एच. कुंभरे, एस.आर. शेंडे, एन.पी. वैद्य उपस्थित होते. आभार उपरीकर यांनी मानले.
तालुका विधि सेवा समिती (योग)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:20 IST