शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्याने बैठकीला हजेरी लावल्याने चर्चेला उधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 21:29 IST

सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याना कामे वाटप करण्यासाठी शुक्रवारी (दि.२१) जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. पण या बैठकीला जि.प.चा एक जबाबदार पदाधिकारीच उपस्थित असल्याने मजूर सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यानी आश्चर्य व्यक्त केले.

ठळक मुद्देकामे वाटप समितीची सभा : राजकीय हस्तक्षेपाची शंका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याना कामे वाटप करण्यासाठी शुक्रवारी (दि.२१) जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. पण या बैठकीला जि.प.चा एक जबाबदार पदाधिकारीच उपस्थित असल्याने मजूर सहकारी संस्थेच्या पदाधिकारी व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यानी आश्चर्य व्यक्त केले. यामुळे कामे वाटपात राजकीय हस्तक्षेप तर करण्यात आला नाही अशी जोरदार चर्चा आहे.गोंदिया जि.प.सार्वजनिक बांधकाम विभाग, लघु सिंचन विभाग व ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याना जी कामे शासकीय नियमानुसार वाटप करावयाची असतात, त्यासाठी काम वाटप समिती तयार करण्यात आली आहे. शासनाच्या धोरणानुसार या काम वाटप समितीचे अध्यक्षपद २००७&पर्यंत प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधीक्षक अभियंता यांच्याकडे होते. सचिव पद हे जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे आहे. परंतु २०१० मध्ये यात सरकारने बदल करीत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेच्या काम वाटप समितीचे प्रमुख अध्यक्ष असतील तर सचिव पदावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि सदस्यांमध्ये लघु सिंचन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा उपनिबंधक यांचा समावेश आहे.शासन धोरणानुसार या समितीमध्ये जिल्हा परिषदेच्या एकाही पदाधिकाऱ्याचा कुठेही या समितीत समावेश नाही. मात्र यानंतरही जि.प.चा एक जबाबदारी या बैठकीला उपस्थित असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या संदर्भात समितीचे सदस्य सचिव व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना विचारणा केली असता त्यांनी मात्र पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहू शकतात असे सांगून नवीनच जावई शोध लावला आहे. त्यामुळे या प्रकाराने अनेकांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.

टॅग्स :zpजिल्हा परिषद