शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

तंटामुक्तीने लावलेल्या लग्नांची नोंद घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:57 IST

जातीयवादाला थारा न देता सर्वधर्म समभावाची संकल्पना साकारण्यासाठी शासनाने समाज कल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना अमंलात आणली.

प्रेमप्रकरणातूनच आंतरजातीय विवाह : १७० आंतरजातीय, ९२ प्रेमविवाहलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जातीयवादाला थारा न देता सर्वधर्म समभावाची संकल्पना साकारण्यासाठी शासनाने समाज कल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना अमंलात आणली. गोंदिया जिल्ह्यातही आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढत आहेत. मागील सात वर्षात गोंदिया जिल्ह्यात हजारावर आंतरजातीय विवाह झाले. जिल्ह्यात एकूण १७० आंतरजातीय तर ९२ प्रेमविवाह महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी घडवून आणले. या विवाहाला सुरूवातीला मुलगा व मुलगी यांच्या नातेवाईकांचा तीव्र विरोध असायचा. मात्र तंटामुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे समुपदेशन केले. कुठे आई-वडिलांच्या संमतीने तर कुठे त्यांच्या विरोधाला न जुमानता सज्ञान प्रेमी युगलांचे आंतरजातीय व प्रेमविवाह लावून दिले. तंमुसने लावलेले अनेक आंतरजातीय विवाहाचे जोडपे समाज कल्याण विभागाच्या अनुदानापासून वंचीत आहेत. त्यासाठी त्यांनी स्वत: अर्ज केले नाही किंवा तंटामुक्त समितीनेही पुढाकार घेतला नाही. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने गावातील तंटे गावातच सामोपचाराने सोडविण्याबरोबर जातीय सलोखा कायम राखणे, अंधश्रध्दा निर्मुलन करणे, स्त्री भू्रणहत्येवर आळा घालणे, महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणे, वृक्षारोपण करणे व गावाच्या विकासासाठी सण, उत्सव, मेळावे पोलीस बंदोबस्ताशिवाय शांततेत पार पाडणे, महापुरूषांच्या जयंत्या, पुण्यतिथी शांततेत पार पाडण्याबरोबर जातीय बंधनांना झुगारून गावात आंतरजातीय विवाहाचा पायंडा तंटामुक्त समित्यांनी घातला.५२१ जोडप्यांना लाभअस्पृश्य निवारण्यासाठी आंतरजातीय योजना अमंलात आणली. आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अनुदान देण्याचे काम शासन १९५८ पासून करीत आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती व दुसरा व्यक्ती दुसरा म्हणजेच सुवर्ण, हिंदू लिंगायत असल्यास आंतरजातीय मानण्यात येते. शासनाने सदर योजनेंतर्गत ३० जानेवारी १९९८ पासून १ हजार रूपये प्रोत्साहन राशी देण्यात येत होती. परंतु १ फेब्रुवारी २०१० पासून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहन राशी देण्यात येते. गोंदिया जिल्ह्यात सन २०१०-११ पासून सन २०१६-१७ पर्यंत ५२१ जोडप्यांना आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ देण्यात आला. जातीयवादाला बगल देत तरूणमंडळी प्रेम प्रकरणातून या आंतरजातीय विवाहाकडे वळत आहेत.प्रोत्साहनपर जोडप्यांना दिले २ कोटी ४७ लाखआंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन राशी देण्यात येते. सन २०१०-११ या वर्षात ३२ जोडप्यांना ४ लाख ८० हजार, सन २०११-१२ या वर्षात २५ जोडप्यांना १२ लाख ४५ हजार, सन २०१२-१३ या वर्षात १४२ जोडप्यांना ६९ लाख ५५ हजार, सन २०१३-१४ या वर्षात ६७ जोडप्यांना ३२ लाख ८० हजार, सन २०१४-१५ या वर्षात १०४ जोडप्यांना ५१ लाख ९५ हजार, सन २०१५-१६ या वर्षात ७५ जोडप्यांना ३७ लाख ५० हजार, सन २०१६-१७ या वर्षात ७६ जोडप्यांना ३८ लाख रूपये देण्यात आले.