शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 21:50 IST

जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना उन्हाळ््याच्या दिवसात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे. कोणत्याही नागरिकाला पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येवू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध पद्धतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.

ठळक मुद्देकादंबरी बलकवडे : पाणी टंचाईबाबत आढावा बैठक; शुद्ध पाणीपुरवठ्यावर भर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांना उन्हाळ््याच्या दिवसात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले पाहिजे. कोणत्याही नागरिकाला पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येवू नये, यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजनबद्ध पद्धतीने पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी दिले.सोमवारी (दि.२०) जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पाणी टंचाईचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एम.राजा दयानिधी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सुनील कोरडे प्रामुख्याने उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.बलकवडे यांनी, पाण्याचे जे स्त्रोत आहे त्यामधून नागरिकांना शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे. हे स्त्रोत दुरु स्त करु न त्यांचे पुनर्जीवन करण्याचे काम तातडीने हाती घ्यावे. आवश्यक त्या वाड्या-वस्त्या आणि वॉर्डांमध्ये पाण्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम त्वरित करावे. गोंदिया शहरातील दलित वस्तीमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याच्या तक्र ारी आहे. तेव्हा नगर परिषदेने पुढाकार घेवून तेथील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करु न द्यावे. शहरी भागात सर्वांना पाणी मिळावे यासाठी एक महिन्याच्या आत सर्वेक्षण करण्यात यावे. सार्वजनिक विहिरी पाण्याच्या दृष्टीने कशा उपयोगात आणता येईल तसेच बंद अथवा नादुरुस्त विंधन विहिरी दुरु स्त करु न उपयोगात आणण्याचे देखील त्यांनी सूचिवले.पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येकाने पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याच्या पुर्नभरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागती करु न प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. ज्या ठिकाणी सद्यस्थितीत नाईलाजाने टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे तेथील पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण व आवश्यक त्या दुरु स्ती करु न पाणी पुरवठा पुर्ववत सुरु करावा व टँकरने पाणी पुरवठा बंद करावा. ज्या स्त्रोतांमधून नागरिकांना पाणी उपलब्ध होते त्यामध्ये ब्लिचींग पावडर पुरेशा प्रमाणात टाकावे. त्यामुळे दुषित पाणी कुणाच्याही पिण्यात येवून त्यांना आजारांचा सामना करण्याची वेळ येणार नाही. ज्या योजना मंजुरीसाठी शासनाकडे पाठवायच्या आहेत त्या तातडीने पाठवून मंजूरी मिळवून घ्यावी. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्र म आणि राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून ज्या नळ योजना तयार आहेत. परंतू वीज जोडणी अभावी नागरिकांना पाणी मिळत नाही, तेव्हा डिमांड त्वरित भरुन वीज जोडणी करु न घ्यावी.त्यामुळे लवकरच पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. जी कामे प्रगतीपथावर आहेत ती तातडीने पूर्ण करु न पाणी पुरवठा सुरु करावा. पाण्याचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून अहवाल प्राप्त झाल्यानंतर जे पाण्याचे दूषित स्त्रोत आहेत त्याचे निर्जंतुकीकरण करु न ते पाणी वापरण्यायोग्य व पिण्यायोग्य होतील याकडे विशेष लक्ष दयावे असे त्यांनी सांगितले.डॉ.दयानिधी यांनी, जिल्ह्यात विविध ठिकाणी नवीन विंधन विहिरींचे ४३ प्रस्ताव होते, त्यापैकी ३९ प्रस्तावांना मंजूरी मिळाली असून २० कामे पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील २२० विंधन विहिरींची विशेष दुरु स्ती करण्यात आली आहे. टप्पा-३ अंतर्गत १३६ नवीन विंधन विहिरी घेणे, ९६२ विंधन विहिरींची विशेष दुरु स्तीची कामे प्रस्तावित आहेत. लघु नळ पाणी पुरवठा योजनेंतर्गत २२ विद्युत पंप दुरु स्ती व आश्रमशाळेअंतर्गत सहा असे एकूण २८ पंप दुरु स्ती करण्यात आली आहे. सौर ऊर्जेवर आधारित दुहेरी पंप लघु नळ योजनेंतर्गत २० कामे पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी नगरपरिषद, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात पाणी पुरवठा बाबतची सद्यस्थिती व पाणी टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जिल्हा प्रशासन अधिकारी जाधव तसेच संबंधित नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी दिली. ग्रामीण भागातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी दिली. तसेच जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एच.वाय.छप्परघरे व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता आर.पी.चंद्रिकापुरे यांनी सुद्धा त्यांच्या विभागामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.आढावा बैठकीला ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एच.बी.चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.आर.बी.शहारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.राजेश वासनिक, गोंदिया नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील, तिरोडाचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांच्यासह तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी तसेच संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.टिल्लू पंप जप्त कराउन्हाळ््याच्या दिवसांत जास्तीतजास्त पाणी साठवून ठेवण्याच्या दृष्टीने पाणी पुरवठा होत असलेल्या सार्वजनिक तसेच घरगुती नळाला टिल्लू पंप लावून नागरिक पाणी ओढून घेतात. अशात टिल्लू पंप लावून कुणी पाणी घेत असतील तर अशांचे टिल्लू पंप जप्त करु न संबंधितांवर यंत्रणेने कारवाई करण्याचे निर्देश डॉ. बलकवडे यांनी दिले.अन्यथा निलंबनाची कारवाईज्या स्रोतातून नागरिकांना पाण्याची उपलब्धता होते, त्या स्त्रोतांचा परिसर हा नियमीत स्वच्छ ठेवला पाहिजे असे डॉ. बलकवडे यांनी बैठकीत सांगीतले. शुद्ध आणि स्वच्छ पाणी नागरिकांना मिळाले पाहिजे, हा त्यांचा अधिकार आहे. ज्या यंत्रणांकडे स्रोताच्या देखभालीची जबाबदारी सोपविली आहे त्यांनी या कामात हयगय केल्यास संबंधित यंत्रणेच्या जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांवर निलंबनाच्या अप्रिय कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येईल असा स्पष्ट इशारा डॉ. बलकवडे यांनी बैठकीत दिला.