शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

आरोग्य योजनांचा लाभ घ्या

By admin | Updated: March 13, 2015 01:49 IST

आरोग्यविषयक विविध योेजना शासन राबवित आहे. विशेषत: महिलांनी या योजनांचा लाभ घेवून निरोगी रहावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले.

गोंदिया : आरोग्यविषयक विविध योेजना शासन राबवित आहे. विशेषत: महिलांनी या योजनांचा लाभ घेवून निरोगी रहावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी केले. ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथे मंगळवार (दि.१०) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय व दंत चिकित्सा शिबिराचे उद्घाटन डॉ. सैनी यांनी केले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प. महिला व बालकल्याण समिती सभापती सविता पुराम होत्या. या वेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी डॉ. सैनी पुढे म्हणाले, राज्याच्या तुलनेत गोंदिया जिल्ह्यातील अर्भक मृत्यू दर व माता मृत्यू दर कमी झाले आहे. जिल्ह्यात ९९ टक्के स्त्रियांची प्रसूती ही शासकीय रुग्णालयातच होत आहे. महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देवून राज्यात महिला आरोग्य अभियान पंधरवाडा सुरू आहे. या अभियानांतर्गत २६ फेब्रुवारी ते १२ मार्चपर्यंत जास्तीत जास्त महिलांनी न संकोचता निरोगी राहण्यासाठी आपली आरोग्य तपासणी करावी, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढविण्यासाठी जिल्ह्यात मानव विकास योजना राबविण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने जननी सुरक्षा योजना, राजीव गांधी जीवनदायी योजना राबविण्यात येत आहे. या योजनांचा जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे सांगून ते म्हणाले, आशा सेविकांनी समुपदेशनाच्या माध्यमातून महिलांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रमुख अतिथी डॉ. रवी धकाते म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेने आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त आरोग्यविषयक योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिश कळमकर, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजीव दोडके यांनीही मनोगत व्यक्त केले. शिबिरात डॉ. हिंमत मेश्राम, डॉ. प्रशांत मेश्राम, नेत्रतज्ज्ञ डॉ. कांबळे व डॉ. बागडे, डॉ. मनिष बत्रा आदी तज्ज्ञ डॉक्टर्संनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले. शिबिरात सालेकसा, आमगाव व देवरी तालुक्यातील ९७० रुग्णांची तपासणी केली. १० ते १२ मार्चपर्यंत सुरू राहणाऱ्या या वैद्यकीय व दंत शिबिरात तीन हजाराच्यावर रुग्ण लाभ घेतील, असे सांगण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आरोग्य दैवत धन्वंतरी, पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्ज्वलित करण्यात आले. प्रास्ताविक सालेकसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेंद्र घागरे यांनी केले. संचालन व आभार समुपदेशक नितीन फुलझेले यांनी मानले. कार्यक्रमास सालेकसा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंदू वंजारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अरविंद खोब्रागडे, डॉ. सुषमा नितनवरे, डॉ. विवेक अनंतवार, खंडविकास अधिकारी व्ही.यु. पचारे, पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, आरोग्य सेवक-सेविका, आशा सेविका, समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी, मदर टेरेसा नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थिनी, रुग्ण व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)