नगरसेविका यादव यांची मागणी : पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन गोंदिया : उप विभागीय अधिकाऱ्यांनी तडीपार केलेले तसेच फरार आरोपी शहरात वावरत आहेत. अशा गुन्हेगारांपासून स्वत:सह पतीला जीवाचा धोका असल्याने या गुन्हेगारांवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेविका ललिता यादव यांनी केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. उप विभागीय अधिकाऱ्यांनी तडीपार केलेला आरोपी अमित रामलाल बिरीया शहर व जिल्ह्यात फिरत आहे. राजकारण्यांसोबत तो फिरताना दिसत असून अनधिकृ त कामांचे षडयंत्र ते करतात. तसेच कुणाल देवराज महावत व राजा सांडेकर यांच्यासह काही लोक फिरतान दिसत असून त्यांना फेसबूक व व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मिडीयावर बघितले जात आहे. ललिता यादव त्यांचे पती पंकज यादव हे नगरसेवक असल्याने त्यांना नगर परिषद तसेच शहरातील कित्येक भागात फिरावे लागते. त्यामुळे या लोकांपासून त्यांच्या जीवाला धोका आहे. यापूर्वीही राजा सांडेकर व कुणाल महावत यांनी नगर परिषदेत पंकज यादव यांच्यावर जीवघेना हल्ला केला आहे. तसेच केटीएस रूग्णालयातही पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्यावर जीवघेना हल्ला झालेला असल्याचे निवेदनात नमूद आहे. त्यामुळे शहरात फिरत असलेल्या लोकांवर कारवाई करण्यात यावी. तसेच कुणाल व राजा यांचा उच्च न्यायालयातून जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी ललिता यादव यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
तडीपार व फरार गुन्हेगारांवर कारवाई करा
By admin | Updated: April 23, 2017 01:53 IST