शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

घामाचा दाम मिळाला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:22 IST

समाजाच्या विकासाची चर्चा सर्वच करतात. परंतु चर्चा करण्यापुरतेच ते मर्यादित राहतात. देशाचे उदरभरण करणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या घामाचा दाम मिळायला हवा.

ठळक मुद्देनाना पटोले यांचे प्रतिपादन: साकरीटोला येथील कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : समाजाच्या विकासाची चर्चा सर्वच करतात. परंतु चर्चा करण्यापुरतेच ते मर्यादित राहतात. देशाचे उदरभरण करणाऱ्या शेतकऱ्याला त्यांच्या घामाचा दाम मिळायला हवा. शेतकऱ्यांने लावलेल्या बियाणांचा खर्च निघत नाही, त्यांच्या मालाला भाव नाही. सरकारच्या उदासिनतेमुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरीही त्या गरीबांकडून वर्तमान सरकार कर वसुल करीत आहे. समाजाने व शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आता लढले पाहीजे असे उद्गार माजी खा. नाना पटोले यांनी काढले.युवा कुणबी समाज सेवा समिती साकरीटोला (सातगाव) तर्फे जि.प.हायस्कूल साकरीटोलाच्या पटांगणावर आयोजित कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी वनमंत्री भरत बहेकार, गोंदियाचे आ. गोपालदास अग्रवाल, आ. संजय पुराम, माजी आ. राजेंद्र जैन, माजी म्हाडा सभापती नरेश मोहश्वरी, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, महिला व बाल कल्याण सभापती लता दोनोडे, माजी जि.प. अध्यक्ष उषा मेढे, जि.प. सदस्य सुखराम फुंडे, नरेश रहिले, देवरीच्या पं.स. सभापती सुनंदा बहेकार, जि.प.सदस्य जियालाल पंधरे, सालेकसाचे उपसभापती दिलीप वाघमारे, सहेसराम कोरोटे, संपत सोनी, विजय बहेकार, लिलाधर पाथोडे, एल.एस. भुते, काशिराम हुकरे, तुकाराम बोहरे, जि.प. सदस्य छाया शहारे, जिल्एा मध्यवर्ती बँक भंडारचे सुनिल फुंडे, दिगंबर कोरे, रमेश ताराम, सविता पुराम, मोहीनी निंबार्ते, हुकूमचंद बहेकार व इतर समाजबांधव उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आ. गोपालदास अग्रवाल यांनी, समाजाचे महत्व पटवून देताना संघटीत समाजासमोर सरकारही झुकते असे सांगितले. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, भरत बहेकार, आ. संजय पुराम, माजी आ. राजेंद्र जैन यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर दोनोडे यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रभाकर दोनोडे, कमलबापू बहेकार, युगराम कोरे, भुमेश्वर मेंढे, रमेश चुटे, देवराम चुटे, पृथ्वीराज शिवणकर, अरविंद फुंडे, नामदेव दोनोडे, रामदास हत्तीमारे, संतोष बोहरे, प्रकाश दोनोडे, पुरूषोत्तम कोरे, शैलेश मेंढे, योगेश बहेकार, प्रल्हाद मेंढे, नंदू चुटे, मनोज चुटे, प्रेम कोरे, मोहन दोनोडे, देवेंद्र बहेकार, प्रेमलाल ठाकरे, डॉ. संजय देशमुख, राजू काळे, श्यामलाल दोनोडे, संजय दोनोडे, देवराज खोटेले, टेकचंद फुंडे, माधोराव कोरे, डॉ. रमेश बोहरे, मोहन दोनोडे, पसराम फुंडे, चैतराम चुटे, डॉ. हेमंत फुंडे, रमेश बहेकार व समाजबांधवांनी सहकार्य केले.१४ जोडपी विवाहबद्धयुवा कुणबी समाज सेवा समिती साकरीटोला (सातगाव) तर्फे जि.प.हायस्कूल साकरीटोलाच्या पटांगणावर आयोजित कुणबी समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यात १४ जोडपी विवाहबद्ध झालीत. या विवाह सोहळ्यातील जोडप्यांना मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमी व प्रताप मेमोरीयल चेरीटेबल ट्रस्टतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. मंगलाष्टके आमगाव येथील भरत चुटे व रवी कोरे यांनी गायीले.समाज भवनासाठी लोकनिधीसाकरीटोला येथे कुणबी समाज भवन बांधण्याचा प्रस्ताव सात वर्षापूर्वीपासून होता. यासाठी त्यावेळी खा. प्रफुल्ल पटेल, आ. नाना पटोले यांनी निधीही जाहीर केला होता. परंतु या समाज भवनासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे तो निधी वापरता आला नाही. आता समाजभवनासाठी जागा उपलब्ध झाल्याने लोकप्रतिनिधींनी निधी देण्याची घोषणा केली आहे. त्यावेळी खा. प्रफुल्ल पटेलांनी घोषणा केलेले १० लाख रूपये आता दिले जाणार आहेत. आ. संजय पुराम यांनी १० लाख रूपये देण्याची घोषणा केली. या भवनाला सर्वतोपरी मदत करू असे आ. गोपालदास अग्रवाल, माजी खा. नाना पटोले म्हणाले. तसेच समाजातील अनेक लोकांनी देणगी दिली आहे.

टॅग्स :marriageलग्न