आमगाव : नगरातून गोंदियाकडे रस्त्याचे रूंदीकरण होणार आहे. ही अफवा अनेक दिवसांपासून काही लोक स्वार्थ ठेऊन अपप्रचार करीत आहेत. या रस्ता रूंदीकरणाच्या अफवेमुळे अनेक नागरिक भयभित झाले आहेत. काही व्यक्तींनी घराचे किंवा रस्त्याशेजारी जो जमीन विकत घेण्याचा सौदा केला तो रद्द करण्यात आला. मात्र संबंधित बांधकाम विभागाला अशाप्रकारे रस्ता रूंदीकरणाचा आदेश किंवा पत्र आलेला नाही. काही संधीसाधू व्यक्तींनी स्वत:चे हित साधून देवरी व्हाया आमगाव ते गोंदिया रस्त्याचे रूंदीकरण होणार असल्याची अफवा पसरविली. ती अफवा मोठ्या प्रमाणात जनसामान्यांपर्यंत पोहचली. हा अपप्रचार अनेक महिन्यांपासून नगरात सुरू आहे. अपप्रचार करणारे काही बोटावर मोजणारे स्वहित साधणारे लोक आहेत. त्यांच्या या अफवेमुळे तसेच अपप्रचारामुळे झालेले घरांचे सौदे किंवा इशारपट्टी रद्द झाल्याचे प्रकरण समोर आले आहेत. नगरातील मुख्य मार्गावरील जमीन व घरे यांचे भाव मागील वर्षी खूप झाले होते. तसेच देवरी मार्ग व किडंगीपार मार्गाला लागून शेत जमिनीचे भाव खूप वाढले होते. मात्र विघ्नसंतोषी लोकांच्या सुपीक डोक्यात कोणती खोचट कल्पना आली व त्यांनी अपप्रचार सुरू केला. त्यामुळे अनेकांच्या घरांचे व शेतजमिनीचे भाव क्षणार्धात कमी झाले. घेतलेल्या सौदापट्टीचे पैसे घेणाऱ्यांनी परत मागितले. यात काही चाणाक्ष वृत्तीच्या लोकांचा मोठा हातभार आहे. अपप्रचार करणाऱ्यांवर बारिक लक्ष ठेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला तर हा प्रचार बंद होईल. शासन किंवा केंद्रशासनाकडून असा रस्ता रूंदीकरणाचा कुठलाच प्रस्ताव नाही किंवा संबंधित बांधकाम विागाला कोणतीच लेखी सूचना नाही. केवळ हा अपप्रचार काही लोक करीत आहेत. त्यांना पोलीस प्रशासनाकडून चपराक आवश्यक आहे. किंवा ज्यांच्यामुळे हा अपप्रचार होतो, त्यांच्याकडे लेखी शासन आदेश असेल तर त्यांनी तो सार्वजनिक करावा, अशी अनेकांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)
रस्ता रूंदीकरणाच्या अफवेमागे ‘स्वार्थकारण’
By admin | Updated: January 12, 2015 22:53 IST