लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरूवारपर्यंत (दि.२३) एकूण १९९ जणांचे स्वॅब नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यापैकी १४१ स्वॅब नमुन्यांचा अहवाल जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. हे सर्व १४१ नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर उर्वरित ५८ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात गोंदिया येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर उपाययोजना राबविल्या. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. तर पहिला कोरोना बाधीत रुग्ण देखील आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तसेच मागील २२ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला नाही. त्यामुळे गोंदिया जिल्हा पृूर्णपणे कोरोनामुक्त झाला आहे. गोंदिया जिल्हा पूर्णपणे कोरोना मुक्त राहावा यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्यावतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने एखाद्या व्यक्तीला थोडीही लक्षणे दिसताच त्यांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करु न त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने घेवून ते नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जात आहे. याच अनुषंगाने आरोग्य विभागाने गुरूवारी (दि.२३) ५८ जणांचे स्वॅब नमुने घेवून ते नागपूर मेयो येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहे. या नमुन्यांचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. सध्या जिल्ह्यातील ४ शासकीय क्वारंटाईन कक्षात एकूण ७० जण उपचार घेत आहेत. यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल मध्ये ४७, गोंदिया आयुर्वेदिक कॉलेज मध्ये १०, चांदोरी येथे १२ आणि लहीटोला १ अशा एकूण ७० व्यक्तींचा समावेश असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजीव दोडके यांनी सांगितले.जिल्ह्यात तीन ठिकाणी कोरोना केअर सेंटरकोरोना संसर्गाच्या अनुषंगाने वेळीच उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे आमगाव, नवेगावबांध व येरंडी येथे प्रत्येकी १०० खाटांचे कोरोना केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. सर्व सेंटर जवळील ग्रामीण रु ग्णालय आणि उपजिल्हा रु ग्णालयाशी सलग्न करण्यात आले आहे. यावर येथील वैद्यकीय अधीक्षकांचे लक्ष राहणार आहे.गावकरी घेत आहेत दक्षताराज्यात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा सील केल्यानंतरही बाहेरील राज्य आणि जिल्ह्यातून नागरिक येत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनी गावबंदी करून बाहेरून गावात येणाऱ्यांना १४ दिवस गावातील शाळेतच क्वारंटाईन करून ठेवण्याची व्यवस्था केली आहे.
५८ जणांचे स्वॅब नमुने पाठविले तपासणीसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST
जिल्ह्यात गोंदिया येथे कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने युद्ध पातळीवर उपाययोजना राबविल्या. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आहे. तर पहिला कोरोना बाधीत रुग्ण देखील आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाचा एकही रुग्ण नाही. तसेच मागील २२ दिवसात जिल्ह्यात एकही कोरोनाचा नवीन रुग्ण आढळला नाही.
५८ जणांचे स्वॅब नमुने पाठविले तपासणीसाठी
ठळक मुद्देआतापर्यंत १४१ नुमन्यांचा अहवाल प्राप्त : ७० जण शासकीय क्वारंटाईन कक्षात