लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण २५१ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी २३३ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर १८ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.केंद्र सरकाराने ‘लॉकडाऊन’मध्ये काही भागातील व्यवहार शिथिल करण्यासाठी विविध जिल्ह्यांचे ग्रीन, ऑरेंज, रेड अशा तीन विभागांत विभाजन केले आहे. गोंदिया जिल्ह्यात मागील २३ दिवसांच्या कालावधीत एकही कोरोना बाधीत रु ग्ण आढळला नसल्याने जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जवळपास दीड महिन्याच्या कालावधीपासून संपूर्ण बाजारपेठ ठप्प आहे. त्यामुळे अनेकांचा रोजगार सुद्धा हिरावला गेला होता. मात्र आता जिल्हा ग्रीन झोनमध्ये आल्याने जिल्हावासीयांना बराच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये आला असला तरी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य राहणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही तशा उपाययोजना केल्या जात आहे.६२ जण शासकीय क्वारंटाईन कक्षातजिल्ह्यातील सात संस्थात्मक क्वारंटाईन कक्षात सध्या ६२ जण उपचार घेत आहे. यात जिल्हा क्रीडा संकुल येथे १५, एम.एस.आयुर्वेदिक कॉलेज येथे १७, ग्राम चांदोरी येथे ११, तिरोडा येथील लिटिल बर्ड कॉन्व्हेंट येथे पाच, ग्राम डव्वा येथील समाज कल्याण निवासी शाळेत सहा, ग्राम इळदा येथील शासकीय आश्रमशाळेत पाच आणि ग्राम बिरसी उपकेंद्र येथे चीन अशा एकूण ६२ व्यक्तींचा समावेश आहे.आजपासून काही व्यवहार सुरळीतगोंदिया जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश असल्याने केंद्र सरकारच्या गाईड लाईननुसार काही व्यवहार करण्यास शिथिलता मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही व्यवहार सुरळीत होण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांना ‘सोशल डिस्टंसिंग’, मास्कचा वापर आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.
२३३ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST
केंद्र सरकाराने ‘लॉकडाऊन’मध्ये काही भागातील व्यवहार शिथिल करण्यासाठी विविध जिल्ह्यांचे ग्रीन, ऑरेंज, रेड अशा तीन विभागांत विभाजन केले आहे. गोंदिया जिल्ह्यात मागील २३ दिवसांच्या कालावधीत एकही कोरोना बाधीत रु ग्ण आढळला नसल्याने जिल्ह्याचा ग्रीन झोनमध्ये समावेश केला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. जवळपास दीड महिन्याच्या कालावधीपासून संपूर्ण बाजारपेठ ठप्प आहे.
२३३ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह
ठळक मुद्दे१८ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त : नवीन रु ग्णाची नोंद नाही