शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

सहा विभागातील ४० कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 10:21 PM

शासकीय कामात हलगर्जीपणा किंवा अनागोंदी काम करणाऱ्यांना निलंबनाचा सामना करावा लागतो. येथील मिनी मंत्रालयातून चालणाऱ्या कारभारात अशीच अनागोंदी करणाऱ्यांना जिल्हा परिषदेने झटका दिला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण १३ विभागांपैकी तब्बल सहा विभागातील ४० कर्मचारी आजघडीला निलंबित आहेत. यामुळे जिल्हा परिषदेचे प्रशासन चालविण्यासाठी अनेक अडचणी समोर येताना दिसतात.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेने दिला झटका : सर्वाधिक कर्मचारी शिक्षण विभागातील

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय कामात हलगर्जीपणा किंवा अनागोंदी काम करणाऱ्यांना निलंबनाचा सामना करावा लागतो. येथील मिनी मंत्रालयातून चालणाऱ्या कारभारात अशीच अनागोंदी करणाऱ्यांना जिल्हा परिषदेने झटका दिला आहे. जिल्हा परिषदेच्या एकूण १३ विभागांपैकी तब्बल सहा विभागातील ४० कर्मचारी आजघडीला निलंबित आहेत. यामुळे जिल्हा परिषदेचे प्रशासन चालविण्यासाठी अनेक अडचणी समोर येताना दिसतात.ग्रामीण भागाच्या विकासासाठी असलेली स्वायत्त संस्था म्हणजे जिल्हा परिषद आहे. या जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय असे संबोधले जाते. या मिनी मंत्रालयात अनागोंदी कारभार व भ्रष्टÑाचाराला वाव असल्यामुळे त्रस्त झालेले लोक लोकसेवकांची तक्रार जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करतात. गोंदिया जिल्हा परिषदमध्ये निलंबित असलेल्या कर्मचाऱ्यांत बहुतांश कर्मचारी लाच घेताना आढळले आहेत. तर काहींना अनागोंदी कारभार भोवला आहे.विशेष म्हणजे, जिल्हा परिषद शिक्षण विभागातील सर्वाधीक १७ कर्मचाºयांना निलंबित करण्यात आले आहे. त्या पाठोपाठ पंचायत विभागातील १२ कर्मचारी आहेत. यातील सर्वात जास्त ग्रामसेवक आहेत. त्यानंतर ५ कर्मचारी आरोग्य विभागातील आहेत. सामान्य प्रशासन विभागातील ३ कर्मचारी आहेत. २ कर्मचारी बांधकाम विभागातील तर एक कर्मचारी वित्त विभागातील आहे. असे एकूण ४० कर्मचारी सध्या निलंबित आहेत. यातील २८ टक्के कर्मचाºयांना ५० टक्के निर्वाह भत्ता तर ११ कर्मचाºयांना ७५ टक्के निर्वाह भत्ता दिला जात आहे. परंतु पंचायत विभागातील निलंबित असलेल्या १२ कर्मचाºयांपैकी एक कर्मचारी कंत्राटी स्वरूपाचा असल्यामुळे त्याला निर्वाह भत्ता दिला जात नाही.बहुतांश कर्मचारी पुनर्स्थापितगोंदिया जिल्हा परिषदेला मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून डॉ. राजा दयानिधी कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायला कुचराई केली नाही व तात्काळ निलंबित केले. परंतु निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच पुनर्स्थापित केले. पुनर्स्थापित करतांना मात्र त्या कर्मचाऱ्यांना जवळचे कार्यालय न देता दुर्गम किंवा अतिदुर्गम भागात पाठविले आहे.कारवाई गुरुजींवर भारीविद्या दानाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुरूजींवर मागील वर्षा २ वर्षात विद्यार्थिनींच्या लैंगीक छळामुळे निलंबित होण्याची पाळी आली. जिल्हा परिषदेतील शिक्षकांचे एक ना अनेक लैंगीक शोषणाचे प्रकरण समोर आले. मुले शिकविण्यासाठी असलेले मास्तरच दुर्व्यवहार करत असतील तर त्यांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावेच लागेल हा कडक पवित्रा डॉ. दयानिधी यांनी घेतला व कारवाई देखील केली आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांत सर्वात जास्त कारवाई शिक्षकांवर करण्यात आली आहे. एकेकाळी अनागोंदी कारभारामुळे ग्रामसेवकांवर निलंबनाची पाळी येत होती. परंतु आता लैंगीक शोषणामुळे गुरूजींवर कारवाई करण्यात आली आहे.