शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

७ लाखाचे बक्षी असलेल्या नक्षलवाद्याचे आत्मसमर्पण : ११ वर्षापासून नक्षल चळवळीत होता सक्रीय

By नरेश रहिले | Updated: June 19, 2024 19:44 IST

गोंदिया पोलीसांची यशस्वी कामगिरी

नरेश रहिले, गोंदिया : जहाल माओवादी पहाडसिंग याचा अंगरक्षक म्हणून काम करणारा तसेच दर्रेकसा एरिया कमिटी, प्लॉटून -१, व (सी.एन. एम.) चेतना नाटय मंच मध्ये काम करणारा आणि गोंदिया जिल्ह्यातील पोलिस नक्षल चकमकीत काम करणाऱ्या जहाल नक्षलवादी संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम (२५) रा. पुसनार, ता. गंगालूर, जि. बिजापूर ( छत्तीसगड) असे आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्याचे नाव आहे. त्याच्यावर ७ लाखाचे बक्षीस होते.

देशातील माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता तसेच त्यांचे सामाजिक व आर्थीक पुनर्वसन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत नक्षल आत्मसमर्पण योजना राबवित आहे. या आत्मसमर्पीत नक्षलवादी बीच्छेम याने जिल्हाधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्यासमक्ष नक्षलवाद्यांच्या त्रासाला कंटाळून ३ जून रोजी आत्मसमर्पण केले आहे. संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम याने सन २०१७-२०१८ मध्ये प्लॉटून-१ मध्ये कार्यरत असताना गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत मुरकुटडोह, टेकाटोला, तसेच चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत कोसबी जंगल परिसरात घडलेल्या नक्षल- पोलीस चकमकीत सक्रीय सहभाग होता.माओवाद्यांच्या भूलथापाला बळी पडू नकामाओवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्याकरीता गोदिया जिल्हयात प्रभावी नक्षल विरोधी अभियान राबविण्यात येत आहे. विविध उपक्रम राबवून शासनाच्या कल्याणकारी योजनांची जनतेला, नागरिकांना माहिती देवून जनजागृती करण्यात येत आहे. जे माओवादी विविध भूलथापा आणि प्रलोभनांना बळी पडून माओवादी संघटनेत भरती झाले आहेत. त्यांना हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.आत्मसमर्पीत होण्याची सांगितली कारणे- नक्षल संघटनेचे/चळवळीचे नेमके ध्येयधोरण खालील कॅडर ला कळत नाही. भविष्य अंधकारमय वाटतो. माओवादी संघटनेतील वरिष्ठ कॅडर हे नक्षल चळवळी करीता पैसे/फंड गोळा करण्याबाबत सांगतात. परंतु प्रत्यक्षात सदर पैसा हे स्वतःसाठीच वापरतात.- शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे जनतेचा माओवाद्यांना पाहिजे तसा पाठींबा मिळत नाही. माओवादी नेते हे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक- युवतींचा वापर करुन घेतात.- दलममध्ये असतांना विवाह झाले तरी वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. परीवारातील सदस्यांना, नातेवाईकांना कोणतीही अडचण असली तरीही मदत करता येत नाही. दलममध्ये असतांना वेळेवर जेवण मिळत नाही. तेथील जिवन फार खडतर असते. आरोग्या विषयीं समस्या, उद्भवल्यास त्याकडे काळजीपूर्वक लक्ष दिले जात नाही.- पोलीस दलाच्या सततच्या नक्षल विरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे. पोलिसांची सारखी भीती वाटते. वरिष्ठ कॅडर हे पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन निरपराध आदिवासी बांधव/ सामान्य नागरीकांना ठार मारायला सांगतात. महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावित होऊन समर्पण करण्याचा निर्णय घेतला असे बीच्छेम चे म्हणणे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीgondiya-acगोंदिया