शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

आश्चर्य.. ४३ वर्षांनंतरही मानाकुही प्रकल्पाचे लिकेज सापडेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज मागील ४३ वर्षांपासून कायम असून, त्याला बंद करण्यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नाही.

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जेव्हा पाण्याची किमत कळते आणि प्रत्यक्ष पाण्याची टंचाई भासते तेव्हा पाण्याचा महत्त्व कळते. यासाठी शासन प्रशासन स्तरावर पाणी बचतीसाठी विविध उपाययोजना केल्या जातात. पण तालुक्यात असे कुठलेच प्रयत्न केले जात नसल्याचे चित्र आहे. मृदा व जलसंधारण विभागाअंतर्गत येणाऱ्या मानाकुही प्रकल्पाकडे शासनाची वक्रदृष्टी झाल्याने या प्रकल्पाची पूर्णपणे वाताहत झाली आहे. तालुक्यातील ८० ते ९० टक्के लोकांचा उदरनिर्वाह हा कृषी आणि आधारित पूरक व्यवसायावर अवलंबून आहे. अशात सिंचनाची सोय असलेली शेती महत्त्वाची असून, सिंचन प्रकल्प येथील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतात. ही बाब लक्षात घेता तालुक्यातील गोर्रे-मानागढ-रामाटोला मार्गाच्या निकट पर्वत रागांच्या पायथ्यालगत मानाकुही प्रकल्प तयार करण्याचा निर्णय शासनाने १९७८ मध्ये घेतला होता. त्यानंतर ०.७९० दशलक्ष घनमीटर पाण्याची  साठवण क्षमता असलेला जलाशय तयार करण्यात आले. त्याला एकाच गेटमधून पाणी वाटपाची सोय आणि शेतीला सिंचनासाठी एक मुख्य कालवा व पुढे छोटे उपकालवे तयार करण्याचे नियोजन होते. धरण तयार झाले, पाणी साठवण होऊ लागले, परंतु गेटमध्ये आतून बिघाड असल्याने या धरणातून सतत पाण्याचे लिकेज होऊ लागले. एकदा सुरू झालेला लिकेज मागील ४३ वर्षांपासून कायम असून, त्याला बंद करण्यासाठी संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. पाण्याचे वितरण शेतीपर्यंत वितरण व्हावे म्हणून कालवा तयार केला नाही. त्यामुळे या प्रकल्पातून पाण्याचा अपव्यय सुरूच आहे. 

मानाकुही प्रकल्प किती उपयोगाचा- मानाकुही तलावाच्या गेटमधील दुरुस्ती कायम स्वरूपाची करून शेतीला सिंचन करण्यासाठी ७.५० कि.मी.चा मुख्य कालवा आणि ६.२ कि.मी.चा उपकालवा तयार केल्यास मानागड, रामाटोला, शिकारीटोला, भरीटोला, कुलरभट्टी या गावातील जवळपास २१९ हेक्टरपेक्षा जास्त शेतीला खरीप आणि रबी दोन्ही हंगामात पाणी मिळू शकते. सोबतच मानाकुही जलाशयात अतिरिक्त जलसाठा वाढल्यास तो पाणीनजीकच्या मानागड तलावात सोडण्याची व्यवस्था झाली, तर वाया जाणारा पाणी उपयोगात येऊ शकतो तो पाणी सालेकसा शहराला पाणीटंचाईच्या वेळी उन्हाळ्यात मोठा लाभदायक ठरू शकतो.  

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण