लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात निवडणुकी दरम्यान जे सरकार विरोधी वातावरण व चर्चा होती. त्यानुसार आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री होती. मात्र भाजप उमेदवाराला मिळालेली १ लाख ९७ हजार मतांची लीड व निकाल पाहता आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे खा.प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी (दि.२८) गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोंदिया येथे प्रथमच आयोजित पत्रकार परिषदेत खा.पटेल बोलत होते. भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकी दरम्यान आपण सुध्दा सहा खासगी सर्वेक्षण संस्थाच्या माध्यमातून मतदारसंघात सर्वेक्षण केले. तसेच निवडणुकी दरम्यान प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून दररोज आढावा घेत होतो. त्यानुसार आपल्या पक्षाच्या उमेदवाराची स्थिती चांगली होती. किमान ५० ते ६० हजार मतांनी राष्टÑवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास होता. मात्र निवडणुकीच्या निकाल आणि भाजप उमेदवाराला मिळालेली १ लाख ९७ हजार मतांची लीड हे अनपेक्षीत आहे. निवडणुकीत जय पराजय हा होत असतो. त्यामुळे विजयी उमेदवारांकडून या दोन्ही जिल्ह्याच्या विकासाची अपेक्षा आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करु असेही पटेल यांनी सांगितले. मात्र या निवडणुकीत तिरोडा,अर्जुनी मोरगाव, तुमसर, भंडारा या विधासभा मतदारसंघात आपल्या पक्षाच्या उमेदवाराला आघाडी मिळेल असा विश्वास होता. मात्र या मतदारसंघातून भाजप उमेदवाराला मिळालेला मतांवरुन आपण निरुत्तर झाले असल्याचे सांगितले. या सर्व गोष्टींचे जरुर मंथन केले जाईल.तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार असल्याचे सांंगितले. पत्रकार परिषदेला माजी आ. राजेंद्र जैन, माजी जि. प. अध्यक्ष विजय शिवणकर, जि. प. सदस्य गंगाधर परशुरामकर, नगरसेवक विनित शहारे उपस्थित होते.
मतदारसंघातील निवडणूक निकालाचे आश्चर्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 23:21 IST
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात निवडणुकी दरम्यान जे सरकार विरोधी वातावरण व चर्चा होती. त्यानुसार आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या विजयाची खात्री होती. मात्र भाजप उमेदवाराला मिळालेली १ लाख ९७ हजार मतांची लीड व निकाल पाहता आपल्याला आश्चर्य वाटत असल्याचे खा.प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी (दि.२८) गोंदिया येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
मतदारसंघातील निवडणूक निकालाचे आश्चर्य
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागणार