बिरसी एयरपोर्ट : २४ तासांत होऊ शकते उड्डाणासाठी तयारगोंदिया : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील १० ठिकाणांतून प्रवासी विमान सेवा सुरू करण्याची काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती. यापैकी एक ठिकाण गोंदियासुद्धा आहे. गोंदियापासून केवळ १८ किमी अंतरावर असलेल्या बिरसी विमानतळावर नागरी उड्डानासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत.सुविधा उपलब्ध असल्यामुळे केवळ २४ तासांत प्रवासी विमान सेवा सुरू केली जावू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबाद येथील सुप्रीमो एअरलाईन्स विमान सेवा सुरू करण्यासाठी आपली आवड दाखवित आहे. ती ६० सीट्सची विमानाची सेवा गोंदियातून सुरू करण्यासाठी तयार आहे. जर सर्वकाही योग्यरित्या चालले तर ही सेवा लवकरच सुरू होवू शकेल. गोंदिया ते नागपूर-रायपूर होत ही सेवा मुंबई व इतर मोठ्या शहरांसाठी सुरू होवू शकेल. यासाठी आवश्यक व्यवस्था बिर्सी एअरपोर्टवर उपलब्ध आहे.येथे दोन टर्मिनल बिल्डिंग बनून तयार आहेत. १२५ प्रवाशांच्या क्षमता असलेले विमान सहजतेने उतरू व उडू शकतात. २४ तासांत लँडिंगची सुविधा उपलब्ध होईल. रनवेची आॅपरेटिंग व्यवस्था दोन हजार २०० मीटर असावी लागते, मात्र येथे तीन हजार २०० मीटर लांब रनवेची व्यवस्थासुद्धा येथे आहे.केवळ प्रवासी मिळतील किंवा नाही, याच अडचणीत खासगी एअरलाईन्स मागेपुढे पाहतात. आधीसुद्धा येथे अशा प्रकारची तयारी काही खासगी कंपन्यांनी दाखविली होती. परंतु आता काहीतरी होवू शकेल, अशी आशा केली जात आहे.ब्रिटिशकालीन युद्धादरम्यान तयार करण्यात आलेल्या विमानतळाचा आतापर्यंत योग्यरित्या उपयोग करण्यात आला नाही. परंतु आता उपयोग होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. असे झाले तर निश्चितच गोंदिया शहराचे महत्व वाढणार आहे. (प्रतिनिधी)प्रवासी विमान सेवेसाठी पूर्ण व्यवस्था आधीपासूनच आमच्याकडे उपलब्ध आहे. जर आज विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो तर केवळ २४ तासांत आम्ही ही सेवा देण्यासाठी तयार आहोत.-सुभाष प्रजापती,निदेशक, भारतीय विमानतळ प्राधिकरण, बिरसी विमानतळ गोंदिया.
गोंदियाला मोठ्या शहरांनी जोडणार सुप्रिमो एअरलाईन्स
By admin | Updated: November 10, 2016 00:34 IST