शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

रेन वॉटर हार्वेस्टिंगला आधाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:08 PM

योग्य नियोजनाअभावी दरवर्षी वाढतच चाललेली पाण्याची टंचाई येणारा काळ किती कठीण याची प्रचिती दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या नियोजनाचे फलीत आहे की आजच्या पिढीला पुरेसे पाणी मिळत आहे.

ठळक मुद्देलोक चळवळीसाठी हवाय पुढाकार : जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : योग्य नियोजनाअभावी दरवर्षी वाढतच चाललेली पाण्याची टंचाई येणारा काळ किती कठीण याची प्रचिती दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या नियोजनाचे फलीत आहे की आजच्या पिढीला पुरेसे पाणी मिळत आहे. त्यामुळे उद्याच्या पिढीसाठी पाणी राखून ठेवयाचे असेल तर आजच नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे जलतज्ज्ञ सांगत आहेत. अशात जल संवर्धनासाठी पावसाचे पाणी अडवून ठेवणे गरजेचे असून यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग हाच एकमेव पर्याय आहे.सध्या अवघ्या देशालाच पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. दरवर्षी पाणी टंचाईची समस्या अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. यावर दरवर्षी काहीतरी उपाय करण्याबाबत बोलले जाते, मात्र प्रत्यक्षात काहीच केले जात नाही. परिणामी पाणी दरवर्षी रडवू लागले आहे. पाण्याची निर्मिती शक्य नाही. मात्र पावसाचे पाणी अडवणे व जिरवणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आज हे सूत्र अंमलात आणण्याची गरज आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरायला शंभर वर्षांहून अधिक काळ लागतो. म्हणजेच, आज आपण वापरत असलेले पाणी कित्येक वर्षांपूर्वीचे असून ही आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे.त्यांच्या नियोजनामुळे आज आपल्या पाणी मिळत असून आपण त्याचा नियोजनशून्यपणे वापर करीत आहोत. आज पाणी मिळत असले तरी उद्याच्या पिढीसाठी आपण आज पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. अशात पावसाचे पाणी अडवून त्याला जमिनीत मुरविण्याशिवाय दुसरा उपाय नाही.परिणामी, रेन वॉटर हावेस्टींग हाच एकमेव यावर पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचे नियोजन केल्यास उद्याच्या पिढीला पाणी मिळणार. यासाठी सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.वर्धा नगर पालिकेचा स्तुत्य उपक्रमखोलवर जात असलेली पाण्याची पातळी व पाणी टंचाईच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेत वर्धा नगरपालिकेने सावधानतेचा पवित्रा घेतला आहे. पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली असून पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात जिरविण्यावर जोर दिला जात आहे. यात शहरवासीयांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी नगर परिषदेने मालमत्ता करात दोन टक्के सवलत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. नगर परिषदेनेही असाच उपक्रम हाती घेतल्यास गोंदियात त्यांचे चांगले परिणाम बघता येणार यात शंका नाही. एवढेच नव्हे तर जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घेण्याची गरज आहे.दंडात्मक कारवाईची गरजशहरासह जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसत आहे. अशात प्रशासनाकडून पाण्याचा जपून करण्याबाबत आवाहन केले जात आहे. असे असतानाही मात्र कित्येकांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय केला जात आहे.मात्र सामान्य नागरिक यावर काहीच करू शकत नाही. अशात जिल्हा प्रशासनाने विशेष फिरते पथक गठीत करून अशा प्रकारांवर नजर ठेवण्याची गरज आहे. पाण्याचा अपव्यय करताना कुणीही दिसल्यास त्याला लगेच दंड आकारल्यास नक्कीच अशांना पाण्याचे मोल कळणार असेही सुज्ञ नागरिक बोलत आहेत.

टॅग्स :Rainपाऊसwater shortageपाणीटंचाई