शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

नळातून दुर्गंधयुक्त गढूळ पाण्याचा पुरवठा; तक्रार करूनही काहीच फायदा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 15:46 IST

सिव्हिल लाइन्स परिसरातील प्रकार : शहरवासी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : काही दिवसांपूर्वी गोविंदपूर परिसरातील भागात दुर्गंधयुक्त गढूळ पाणी नळातून येत असतानाच आता तोच प्रकार सिव्हिल लाइन्स परिसरातील सिंचन विभागातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत घडत आहे. येथील नळातून दुर्गंधयुक्त गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. मागील १० दिवसांपासून हा प्रकार सुरू असून अद्याप महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही.

गोंदिया शहर व लगतच्या ग्राम कुडवा व कटंगी यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र उन्हाळ्यापासून मजीप्राच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. कधी वीज पुरवठा खंडित होणे, कधी पाइपलाइन फुटणे तर कधी मोटार पंप नादुरुस्त होणे अशा नानाविध कारणांमुळे पाणी पुरवठा वारंवार खंडित होत आहे. दूषित पाण्यापासून सर्वाधिक आजार होत असल्यामुळे नागरिक घरी नळ घेतात मात्र नळाला पाणीच येत नसल्याने त्यांची अडचण होते. हाच प्रकार मजीप्राकडून पाणी पुरवठा वारंवार पाणी पुरवठा खंडित करून केला जात आहे. 

अशातच आता शहरातील सिव्हिल लाइन्स परिसरातील सुभाष बाग समोरील सिंचन विभागातील कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत घडत आहे. मागील १० दिवसांपासून वसाहतीत दुर्गंधयुक्त गढूळ पाणी नळाला येत आहे. पाण्याचा इतका घाण वास येत आहे की, तेथील नागरिकांना ते पाणी पिणे अशक्य झाले आहे. परिणामी येथील नागरिकांना बोअरवेलच्या पाण्यावर वेळ मारून न्यावी लागत आहे. 

तक्रार करूनही काहीच फायदा नाही घडत असलेल्या प्रकारात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र अद्याप विभागाकडून कुणीही पाहणी करण्यासाठी गेलेला नाही. आरोग्य विभागाकडून शुद्ध पाणी पिण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र मजीप्राकडून शुद्ध पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांची अडचण होत असून ते दूषित पाणी पिल्यास मात्र आजारांना बळी पडावे लागणार आहे. अशात मजीप्राने गांभीर्याने घेऊन लगेच उपाययोजना करावी अशी मागणी वसाहतीतील नागरिकांनी केली आहे.

गढूळ पाण्याची समस्या नित्याचीच शहरात कोणत्या कोणत्या भागात गढूळ व दुर्गंधयुक्त पाणी पुरवठा होत असल्याची समस्या आता नित्याचीच झाली आहे. काही दिवसांपूर्वी गोविंदपूर परिसरात हीच समस्या उद्भवली होती. आता सिव्हील लाईन्स परिसरात तोच प्रकार घडताना दिसत आहे. यावर मजिप्राने कायम तोडगा काढण्याची गरज आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदियाwater pollutionजल प्रदूषण