दिवाळीच्या खरेदीचा सुपर संडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2022 09:04 PM2022-10-23T21:04:00+5:302022-10-23T21:05:34+5:30

कोरोना गेल्याने निर्बंधमुक्त सण उत्सवांना सुरुवात झाली. त्यामुळे यंदा व्यावसायिकांनीही जादा भांडवल गुंतवून नवीन माल भरला. खरेदीसाठी गोंदियातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. लहान दुकानांतही ग्राहकांची गर्दी दिसत आहे. नोकरदारांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकही तालुका स्थळावरील बाजारात येऊन वस्तूंची खरेदी करीत आहेत. यंदा नोकरदार व कामगारांच्या हातात दिवाळीपूर्वीच बोनस पडल्याने बाजारात चैतन्य दिसून आले.

Super Sunday of Diwali Shopping | दिवाळीच्या खरेदीचा सुपर संडे

दिवाळीच्या खरेदीचा सुपर संडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गाेंदिया : धनत्रोयदशीच्या सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.२३) दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी बाजारपेठेत मोठी गर्दी  केली  होती. शहरातील गोरेलाल चौक,दुर्गा चौक, गांधी प्रतिमा,गंज बाजार परिसरातील बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ११ वाजतापासून गर्दी केली होती. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीचा सुपर संडेचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. 
 कोरोना गेल्याने निर्बंधमुक्त सण उत्सवांना सुरुवात झाली. त्यामुळे यंदा व्यावसायिकांनीही जादा भांडवल गुंतवून नवीन माल भरला. खरेदीसाठी गोंदियातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. लहान दुकानांतही ग्राहकांची गर्दी दिसत आहे. नोकरदारांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकही तालुका स्थळावरील बाजारात येऊन वस्तूंची खरेदी करीत आहेत. यंदा नोकरदार व कामगारांच्या हातात दिवाळीपूर्वीच बोनस पडल्याने बाजारात चैतन्य दिसून आले. यंदाच्या दिवाळीला प्रत्येकच कुटुंब कपडे,
कापड बाजार सर्वाधिक तेजीत दिवाळीत  सोने खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे गोंदिया सराफा दुकाने सजली. ग्राहक मोठ्या आनंदाने सोने चांदीचे दागिने खरेदी करीत होते.

ग्राहकांच्या गर्दीने फुलले बाजारपेठेतील रस्ते 

- धनत्रोयदशीच्या सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.२३) सोने,कपडे व इलेक्ट्रिक सामानासह इतर वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. सलग सुट्या लागून आल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. त्यामुळे ग्राहकांच्या गर्दीने शहरातील रस्ते फुलल्याचे चित्र होते.

चारचाकी वाहने बुक करणारेही वाढले
- कोरोनात ऑटोमोबाइल क्षेत्रात मरगळ होती. यंदा दिवाळीनिमित्त चारचाकी वाहने बुक करणाऱ्यांची संख्या वाढली. मोठ्या वाहन कंपन्यांनी सवलतींचा मारा सुरू केला. आता मध्यमवर्गीयांच्या हातात पैसा खुळखुळू लागल्याने चारचाकी इलेक्ट्रॉनिक्स व अन्य जीवनावश्यक वाहने खरेदीदारांची संख्या वाहू लागली आहे. वाहने बुक करणे अजूनही सुरूच आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रातील मरगळ दूर वस्तू खरेदीला प्राधान्य देत आहे होऊ लागल्याची माहिती गोंदिया व्यवसायिकांनी दिली.

आकाश कंदिलांना पसंती
विविध आकारातील पणत्यांबरोबरच मातीचे स्टैंडचे कंदील टांगते दिवे,छोटे नंदादीप विक्रीसाठी उपलब्ध झाले. कागदी, कापडी,काश्मिरी वर्क,कुंदन व भिंगाचे नक्षीकाम असलेले आकाश कंदील तसेच ॲक्रेलिक, प्लास्टिक, पारंपरिक बांबूपासून तयार केलेल्या आकाश कंदिलांची यंदा मागणी आहे.

कपड्यांच्या दुकानात ग्राहकांची गर्दी 
- कापड व्यावसायिकांना दोन वर्षे नुकसान झेलावे लागले. सर्वच निर्बंध हटल्याने यंदा आशा वाढविल्या. रेडिमेड कापड विक्रीतील तेजी लक्षात घेऊन ठोक व्यावसायिकांनी मोठी गुंतवणूक केली. कापड व्यवसायात सर्वात मोठी उलाढाल होत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये यंदा नावीन्य
- इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची बाजारपेठ यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सवापासून पूर्वपदावर आली. सजावटीसाठी नवनवीन वस्तूंची मागणी केल्याने उलाढाल वाढली, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये यंदा नावीन्य दिसून येत आहे.
ऑनलाइन शॉपिंग ही वाढली
- ग्राहक आता घरूनच ऑनलाइन खरेदी करीत आहेत. खरेदीसाठी वेगवेगळ्या साईटस उपलब्ध झाल्या. त्यांच्याकडून विविध सवलती मिळतात. 

 

Web Title: Super Sunday of Diwali Shopping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.